
मुंबई: वास्तुशास्त्रानुसार घरात दिवा लावणे अतिशय शुभ असते. दिवा लावल्याने घरात सुख-शांती येते. वास्तुशास्त्रात म्हटले आहे की घरात दिवा लावल्याने सकारात्मकता येते. तसेच नकारात्मकता निघून जाते.
ज्या घरात दररोज दिवा लावला जातो तेथे नेहमी आनंदाचे वातावरण असते. कधीही पैशांची तंगी राहत नाही. जर घरात आर्थिक समस्या येत असतील तर दररोज घराच्या एका जागेवर दिवा लावणे अतिशय शुभ मानले जाते.

मुंबई: प्रत्येक घरात वास्तुशास्त्राचे महत्त्व असते. सोबतच वास्तुशास्त्राचा आपल्या दैनंदिन जीवनावरही परिणाम होत असतो. घर नेहमीच ...
असे मानले जाते की दररोज घराच्या या ठिकाणी दिवा लावल्याने लक्ष्मी मातेचा वास घरात राहतो. वास्तुशास्त्रात म्हटले आहे की धन संकटापासून सुटका हवी असेल तर घराच्या दरवाजावर दररोज एक दिवा लावला पाहिजे. दरम्यान, एक गोष्ट लक्षात ठेवा की ती जागा नेहमी स्वच्छ असावी. धन देवता लक्ष्मी मातेला अस्वच्छता आवडत नाही.
वास्तुशास्त्रानुसार, जर तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस दिवा लावत असाल तर ते अधिक लाभदायक ठरते. यामुळे तुमच्या घरातील आर्थिक समस्या दूर होईल. तसेच घरात ठेवलेली तिजोरी भरून जाईल.