Thursday, May 1, 2025

देशब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमीक्राईम

'या' पाक कलाकारांवर बंदी, पण 'हे' अजून का मोकळे? भारत सरकारच्या निर्णयावर प्रश्न!

'या' पाक कलाकारांवर बंदी, पण 'हे' अजून का मोकळे? भारत सरकारच्या निर्णयावर प्रश्न!

नवी दिल्ली : दहशतवादाचा डाव मांडणाऱ्या पाकिस्तानवर भारताने आता डिजिटल मारा सुरू केला आहे. पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सोशल मीडियावरून पाक कलाकारांना थेट तोंडावर दरवाजा बंद केला आहे.

इन्स्टाग्रामवर कायदेशीर आदेशाच्या आधारे भारतातील युजर्ससाठी अनेक पाकिस्तानी कलाकारांची खाती बंद करण्यात आली आहेत. आता या कलाकारांना भारतात प्रसिद्धी, फॉलोअर्स आणि मार्केटिंगचा फायदा घेता येणार नाही.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमधील तणाव अधिक तीव्र झाला आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या कायदेशीर विनंतीनुसार इन्स्टाग्रामवर काही नामवंत पाकिस्तानी कलाकारांची खाती भारतात ब्लॉक करण्यात आली आहेत.

भारतीय युजर्सना या खात्यांवर क्लिक करताच "हे खाते भारतात उपलब्ध नाही. आम्ही कायदेशीर विनंतीनुसार हे मर्यादित केले आहे," असा संदेश दिसत आहे.

जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात पाकिस्तानी कलाकारांविरोधात संताप उफाळून आला आहे. या पार्श्वभूमीवर, भारत सरकारच्या कायदेशीर सूचनेनुसार ‘इन्स्टाग्राम’ने महिरा खान, हानिया आमिर, सनाम सईद, अली झफर, बिलाल अब्बास, इम्रान अब्बास, आयझा खान आणि इक़रा अज़ीज यांचे अकाऊंट्स भारतात ब्लॉक केले आहेत.

भारतीय युजर्सना या कलाकारांचे प्रोफाइल ओपन करताना आता स्पष्टपणे असा मेसेज दिसतो – “This account is not available in India. This is because we complied with a legal request to restrict this content.”

परंतु येथेच खरी विसंगती दिसून येते. फवाद खान, अतिफ असलम, सबा कमर, अदनान सिद्दीकी, हामजा अली अब्बासी, वीना मलिक, सरवत गिलानी यांच्यासारख्या अनेक पाकिस्तानी कलाकारांची अकाऊंट्स अजूनही भारतात पूर्णपणे दिसत आहेत आणि सक्रिय आहेत.

हे नेमकं कशामुळे? दहशतवादी देशाच्या कलाकारांवर अर्धवट कारवाई का? काहींवर बंदी, काहींना मोकळीक? असा दुहेरी निकष का?

या कारवाईमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत –
📌 भारत सरकारचे निकष नेमके काय आहेत?
📌 सगळ्या पाकिस्तानी कलाकारांवर एकसारखी बंदी का नाही?
📌 दहशतवादी हल्ल्यानंतरही सोशल मीडिया अकाऊंट्स का सुरू आहेत?

'अबीर गुलाल' या आगामी चित्रपटात फवाद खान झळकणार असल्याने त्याचे इन्स्टाग्राम अकाऊंट उघडे ठेवले गेले का? की काहींना ‘चाल’ द्यायची, तर काहींना ‘कारवाई’ करायची, असा खेळ सुरू आहे?

दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या देशाच्या कलाकारांचा भारतात सन्मान, प्रसिद्धी आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचा रस्ता बंद व्हायला हवा, अशी मागणी आता सोशल मीडियावर जोर धरत आहे.

Comments
Add Comment