नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा हिमाचल प्रदेशचा दौरा रद्द झाला आहे. राष्ट्रपती ५ ते ९ मे दरम्यान त्यांच्या ठरलेल्या कार्यक्रमानुसार हिमाचल प्रदेशच्या दौऱ्यावर येणार होत्या. पण हा दौरा रद्द झाल्याचे राष्ट्रपती कार्यालयाने जाहीर केले आहे.
पहलगाममध्ये आठवडाभर राहिल्यानंतर अतिरेक्यांनी केला हल्ला
श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये मंगळवार २२ एप्रिल रोजी पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी नाव आणि धर्म विचारुन २५ पर्यटक आणि एक स्थानिक अशा एकूण २६ जणांची ...
भारत - पाकिस्तान यांच्यात तणाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींचा दौरा रद्द झाल्याचे वृत्त आले आहे. याआधी जाहीर झालेल्या कार्यक्रमानुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पाच मे रोजी सिमला येथे पोहोचणार होत्या. पण आता राष्ट्रपतींचा पूर्ण हिमाचल दौरा रद्द झाला आहे.
राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी सुरक्षा पाहणी झाली होती. पण गुप्तचर यंत्रणेच्या ताज्या अहवालामुळे राष्ट्रपतींचा हिमाचल दौरा रद्द करण्यात आला आहे. आता राष्ट्रपती हिमाचल प्रदेशचा दौरा कधी करणार हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.
भारत - पाकिस्तान तणाव
पाकिस्तानने सलग सातव्या रात्री शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन गोळीबार केला. भारतीय चौकी - पहारे यांना लक्ष्य करुन पाकिस्तानने गोळीबार केला. भारताकडून सलग सातव्या रात्री पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यात आले. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २६ नागरिकांची हत्या केली. नाव आणि धर्म विचारुन गोळीबार करण्यात आला. या अतिरेकी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. तणाव वाढू लागल्यापासून सातत्याने पाकिस्तान शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे आणि भारताकडून त्याला प्रत्युत्तर दिले जात आहे.