
पाक कलाकारांचे सोशल मीडिया अकाऊंट भारतात बॅन, माहिरा खान, अली जाफर सारख्या अनेक कलाकारांना बंदी
मुंबई: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानची सर्वच सगळ्या बाजूने कोंडी करायला सुरुवात केली आहे. ज्यामध्ये राजनैतिक, आर्थिक तसेच काही युट्युब चॅनलला बॅन करण्याबरोबरच, पाकिस्तानच्या मनोरंजनसृष्टीला देखील जबरदस्त दणका देण्यात आला आहे. कारण, आता पाकिस्तानी कलाकारांचे सोशल मीडियावरील अकाऊंट्सवर बंदी घालण्यात आली आहे. ज्यामध्ये माहिरा खान, अली जफर यांच्यासह अनेक कलाकारांचा समावेश आहे.
पाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये नो एंट्री ची कारवाई याआधीच केली असून, पाकिस्तानी कलाकारांची भूमिका असलेल्या सिनेमांचा भारतीय प्रेक्षक जोरदार विरोध करताना दिसून येत आहे. अभिनेता फवाद खानचा 'अबीर गुलाल' हा हिंदी सिनेमा रिलीज होणार होता, त्यावर देखील बंदी घातली गेली. या सिनेमातील गाणी देखील युट्युबवरून काढून टाकण्यात आले. याच पार्श्वभूमीवर, आता पाकिस्तानी कलाकारांच्या इन्स्टाग्राम अकाऊंट्स भारतात बॅन करण्यात आले आहे.
अनेक भारतीय या पाकिस्तानी कलाकारांना फॉलो करत होते, त्यामुळे त्यांच्या फॉलोअर्समध्येही घट होण्याची शक्यता आहे. यामध्ये फवाद खान. माहिरा खान, हानिया आमिर, मावरा होकेन, आतिफ अस्लम आणी अली जाफर यांचे मात्र अद्याप अकाऊंट बॅन करण्यात आलेले नाहीत.
भारतात पाकिस्तानी सेलिब्रिटींचे इंस्टाग्राम अकाउंट सस्पेंड करण्यात आले असल्यामुळे, सेलिब्रिटींच्या फॉलोअर्समध्ये देखील मोठी घट झाली असण्याची शक्यता आहे. इन्स्टाग्रामवर या पाकिस्तानी कलाकारांचा युजर आयडी सर्च केला की, 'अकाऊंट भारतात उपलब्ध नाही, असं दिसतं.