
मुंबई : मुंबईच्या अंधेरी आरटीओ कार्यालयात फिल्मी स्टाईल फाईट पहायला मिळाली. ईशा नावाच्या महिलेने आरटीओ कार्यालयात घुसून गाडी नावावर न झाल्याने थेट वाद घातला आणि वरिष्ठ लिपीक वृषाली काळे यांच्याशी वादविवाद केला. गाडी कोणालाही न विकताच स्नेहा पांडे यांच्या नावावर कशी गेली? या रागातून ईशाने कर्मचाऱ्यांवर चक्क हात उचलला!
कनिष्ठ लिपीक सुश्मिता भोगले यांनी समजावण्याचा प्रयत्न केला, पण संतप्त ईशाने त्यांनाही नाही सोडलं. आरटीओ कार्यालयात शिवीगाळ, मारहाण आणि संगणक फोडाफोड! या थेट हल्ल्यामुळे संपूर्ण आरटीओ कार्यालयात एकच खळबळ उडाली.
अंबोली पोलिसांनी ईशा विरोधात आयपीसी कलम १३२, १२२(२), ३२४(२), ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.