
सिंधुदुर्ग : कोकणवासियांसाठी कोकण म्हणजे अतूट प्रेम. याचं कोकणातला कोकणी मेवा सर्वांनाच आवडतो. कोकणाच्या निसर्गरम्य वातावरणात फिरायला येणाऱ्यांचीही संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यातून कोकणावरील प्रेम दिसून येत. कोकणात फिरण्यासारखे अनेक पर्यटन स्थळे आहेत. या उन्हाळ्याच्या सुट्टीत कोकणातील सिंधुदुर्गात जाणार असाल तर सिंधुदुर्गातील पर्यटन स्थळांविषयी आणि सिंधुदुर्गाच्या इतिहासाविषयी तुम्हाला माहिती आहे का ?
१ मे हा राज्यभरात महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. १ मे १९८१ साली सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना झाली. पूर्वी रत्नागिरी हा एकच जिल्हा होता. त्याचे विभाजन करून सिंधुदुर्ग नाव ठेवण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा हा सागरी किनाऱ्यावर वसला आहे. पर्यटन, मासेमारी, आंबा, काजू, फणस हे तेथील प्रमुख व्यवसाय आहेत. लांबच लांब सागरी किनारा लाभल्याने येथे पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. निळाशार समुद्र, समृद्ध जंगल आणि निसर्गसौंदर्य यामुळं सिंधुदुर्ग जिल्हा कायमच पर्यटकांचे आकर्षणाचे स्थान आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३८ किल्ले असून त्यात जलदुर्ग, गिरीदुर्ग, भुईकोट या तिन्ही प्रकाराचे किल्ले असणारा एकमेव जिल्हा आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला प्राचीन इतिहास लाभला आहे. १९९९ साली सिंधुदुर्ग जिल्हा हा भारतातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळे जाणून घ्या
आचरा खाडी (बॅकवाटर) आंबोली - थंड हवेचे ठिकाण कुणकेश्वर मंदिर (देवगड) तेरेखोल किल्ला देवगड किल्ला व दीपगृह राजवाडा (सावंतवाडी) मोतीतलाव, सावंतवाडी विजयदुर्ग किल्ला संत राऊळ महाराज मठ कुडाळ पाट तलाव (पाट) सावडाव धबधबा सिंधुदुर्ग किल्ला जय गणेश मंदिर मालवण श्री दत्त मंदिर, माणगाव धामापूर तलाव, धामापूर मालवण यशवंतगड किल्ला, रेडी पांडवकालीन द्विभूज गणपती, रेडी वेंगुर्लाबंदर वेंगुर्ला दिपगृह मालवण रॉकगार्डन पवनचक्की, देवगड आई भराडीदेवी मंदिर, आंगणेवाडी
यावर्षी कोकणात फिरण्याचे नियोजन करत असाल तर या ठिकाणांना नक्की भेट द्या.