दुबईत घरकामाची नोकरी, वार्षिक पॅकेज ८४ लाख रुपये

दुबई : दुबईत घरकामाची नोकरी करण्यास इच्छुक असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एक एजन्सी हाऊसकीपिंग अर्थात घरकामासाठी वर्षाला ८४ लाख रुपये पगार देण्यास तयार आहे.

रॉयल मेसन नावाची एजन्सी आखाती देशांतील राजघराण्यांसाठी आणि श्रीमंतांसाठी हाऊसकीपिंग अर्थात घरकाम करणाऱ्या महिला आणि पुरुष नोकरांची भरती करते. याही एजन्सी व्हीआयपी क्लायंटसाठी अबुधाबी आणि दुबई या ठिकाणी घरकाम करू इच्छिणाऱ्या नोकरांची भरती करत आहे. सध्या तातडीने दोन जणांची भरती केली जाणार आहे. घरकामासाठीच ही भरती होणार आहे. हाऊस मॅनेजर असे पदाचे नाव आहे.

एजन्सी हाऊस मॅनेजरना दरमहा तीस हजार दिऱ्हाम अर्थात सात लाख रुपये देण्यास तयार आहे. या पद्धतीने रॉयल मेसन ही एजन्सी हाऊस मॅनेजरना वर्षभरात ८४ लाख रुपये देणार आहे. रॉयल मेसन एजन्सीने इन्स्टा पोस्ट करुन नोकरभरती सुरू असल्याचे जाहीर केले आहे. घरकामासाठी कुशल कमागारांची अर्थात घरकाम करणाऱ्या महिला आणि पुरुष नोकरांची भरती सुरू आहे. इच्छुकांनी अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हाऊस मॅनेजर म्हणून नोकरी करणाऱ्यांना आलिशान घरांचे कामकाज पाहावे लागेल. त्यांना कर्मचाऱ्यांवर देखरेख करावी लागेल, देखभाल आणि बजेटची काळजी घ्यावी लागेल. घरांमध्ये सेवा पातळी कायम उच्च ठेवावी लागेल.
Comments
Add Comment

कॅनडात १४० कोटींच्या सोन्याची चोरी

मास्टरमाईंड भारतात लपल्याचा दावा टोरंटो : टोरंटो पिअरसन आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या २ कोटी कॅनेडियन

इराणशी व्यापार करणाऱ्या देशांवर अमेरिकेचा २५ टक्के आयातकर

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प व्हेनेझुएलाचे स्वयंघोषित कार्यकारी अध्यक्ष

वॉशिंग्टन  : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय राजकारणात खळबळ

इराणमध्ये अस्थिरता कायम; आंदोलनातील मृतांचा आकडा पाचशे पार..

तेहरान : इराणमध्ये सुरू असलेली सरकारविरोधी आंदोलनं अद्यापही थांबलेली नसून, देशातील अनेक भागांमध्ये परिस्थिती

इराणच्या स्वातंत्र्यासाठी लढण्यास अमेरिका तयार : ट्रम्प

वॉशिंग्टन : इराणमध्ये सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची बैठक

संयुक्त राष्ट्रे : रशियाने यूक्रेनवर केलेल्या नव्या हल्ल्यांनंतर दोन्ही देशांमधील संघर्षाबाबत संयुक्त