Thursday, May 1, 2025

विदेशताज्या घडामोडी

दुबईत घरकामाची नोकरी, वार्षिक पॅकेज ८४ लाख रुपये

दुबईत घरकामाची नोकरी, वार्षिक पॅकेज ८४ लाख रुपये दुबई : दुबईत घरकामाची नोकरी करण्यास इच्छुक असलेल्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एक एजन्सी हाऊसकीपिंग अर्थात घरकामासाठी वर्षाला ८४ लाख रुपये पगार देण्यास तयार आहे. रॉयल मेसन नावाची एजन्सी आखाती देशांतील राजघराण्यांसाठी आणि श्रीमंतांसाठी हाऊसकीपिंग अर्थात घरकाम करणाऱ्या महिला आणि पुरुष नोकरांची भरती करते. याही एजन्सी व्हीआयपी क्लायंटसाठी अबुधाबी आणि दुबई या ठिकाणी घरकाम करू इच्छिणाऱ्या नोकरांची भरती करत आहे. सध्या तातडीने दोन जणांची भरती केली जाणार आहे. घरकामासाठीच ही भरती होणार आहे. हाऊस मॅनेजर असे पदाचे नाव आहे. एजन्सी हाऊस मॅनेजरना दरमहा तीस हजार दिऱ्हाम अर्थात सात लाख रुपये देण्यास तयार आहे. या पद्धतीने रॉयल मेसन ही एजन्सी हाऊस मॅनेजरना वर्षभरात ८४ लाख रुपये देणार आहे. रॉयल मेसन एजन्सीने इन्स्टा पोस्ट करुन नोकरभरती सुरू असल्याचे जाहीर केले आहे. घरकामासाठी कुशल कमागारांची अर्थात घरकाम करणाऱ्या महिला आणि पुरुष नोकरांची भरती सुरू आहे. इच्छुकांनी अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. हाऊस मॅनेजर म्हणून नोकरी करणाऱ्यांना आलिशान घरांचे कामकाज पाहावे लागेल. त्यांना कर्मचाऱ्यांवर देखरेख करावी लागेल, देखभाल आणि बजेटची काळजी घ्यावी लागेल. घरांमध्ये सेवा पातळी कायम उच्च ठेवावी लागेल.
Comments
Add Comment