Saturday, October 25, 2025
Happy Diwali

मे महिन्यात उकाड्याचा कहर! ११ दिवस उष्णतेची लाट वाढणार! जाणून घ्या हवामान अंदाज

मे महिन्यात उकाड्याचा कहर! ११ दिवस उष्णतेची लाट वाढणार! जाणून घ्या हवामान अंदाज

नवी दिल्ली : २०२५ च्या मे महिन्यात भारताला प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागणार आहे, असा इशारा भारतीय हवामान विभागाने (IMD) दिला आहे. राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड या भागांत सामान्यपेक्षा १ ते ४ दिवस अधिक उष्णतेच्या लाटेचे दिवस नोंदवले जाण्याची शक्यता आहे.

आयएमडीचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, एप्रिलमध्ये आधीच ७२ उष्णतेच्या लाटांचे दिवस नोंदवले गेले असून, मे महिन्यात ही संख्या आणखी वाढू शकते. गुजरात व राजस्थानमध्ये ६ ते ११ दिवस, तर विदर्भ, ओडिशा, छत्तीसगड येथे ४ ते ६ दिवस ही लाट राहू शकते. महाराष्ट्रात तुलनेने कमी परिणाम होईल, परंतु उष्णतेपासून पूर्ण सूट मिळणार नाही.

तरीही एक दिलासादायक बाब म्हणजे, मे महिन्यात वारंवार येणाऱ्या वादळांमुळे तापमान काहीसं नियंत्रणात राहू शकते. मे २०२४ मध्ये जसे अती तापमान पाहायला मिळाले, तशी स्थिती यंदा टळण्याची शक्यता आहे.

आयएमडीच्या अंदाजानुसार, देशातील बहुतांश भागात पावसाची पातळी सामान्य ते जास्त राहील. मात्र वायव्य, मध्य आणि ईशान्य भारतात पावसाचे प्रमाण थोडेसे कमी राहू शकते.

उत्तर भारतात मात्र, १०९ टक्के सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याचा अंदाज आहे, ज्यामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळू शकतो.

Comments
Add Comment