Thursday, May 1, 2025

ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजIPL 2025

IPL 2025 : आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! प्रसिद्ध क्रिकेटपटू दुखापतीमुळे बाहेर

IPL 2025 : आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला मोठा धक्का! प्रसिद्ध क्रिकेटपटू दुखापतीमुळे बाहेर

मुंबई : आयपीएलच्या सामन्यात आता चांगलीच रंगत आलेली असताना एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला असून स्टार खेळाडू जखमी झाला आहे. युवा खेळाडू विघ्नेश पुथूर हा स्पर्धेतून बाहेर झाला आहे. मुंबईकडून यंदाच्या वर्षी आयपीएलमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या विघ्नेशला दुखापत झाल्याने त्याला स्पर्धा अर्ध्यावर सोडावी लागणार आहे. २४ वर्षीय विघ्नेश बाहेर गेल्यावर त्याच्या जागी रघु शर्मा याची निवड झाली आहे.

मुंबई इंडियन्सचा खेळाडू विघ्नेश पुथूर याला दुखापत झाल्याने आयपीएल २०२५ ची स्पर्धा अर्ध्यावर सोडावी लागणार आहे. विघ्नेशला मुंबई आणि सीएसकेविरूद्धच्या सामन्यात इम्पॅक्ट प्लेयर म्हणून घेण्यात आलं होतं. त्या सामन्यामध्ये विघ्नेशने तीन विकेट घेतल्या होत्या. यामध्ये शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड आणि दीपक हुड्डा यांना आऊट केले होतं. विघ्नेशने संधीच सोन साधत आपली चोख कामगिरी बजावली. मात्र आता दुखापतीमुळे त्याला मैदानाबाहेर राहावं लागणार आहे. त्याच्या जागी रघु शर्मा याची निवड झाली आहे.

कोण आहे रघु शर्मा ?

रघु शर्मा हा मूळचा पंजाबचा असून त्याला मुंबई इंडियन्स टिमने विघ्नेशच्या जागी घेतले आहे. रघु शर्मा लेग स्पिनर असून त्याने पाँडिचेरी आणि पंजाबसाठी ११ प्रथम श्रेणी, ९ लिस्ट ए आणि ३ टी-२० सामने खेळले आहेत. आता पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफी २०२४-२५ मध्ये ९ सामन्यांमध्ये १४ विकेट आपल्या नावावर केल्या होत्या. मुंबई आता येत्या सामन्यांमध्ये कामगिरी बजावायला त्याला संधी देते की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दरम्यान मुंबई इंडियन्स टिमने आतापर्यंतच्या सहा सामन्यात विजय मिळवला आहे तर चार सामन्यांमध्ये पराभूत झाली आहे. मुंबईने आपल्या विजयाचे वर्चस्व कायम ठेवले तर त्यांना अंतिम ४ मध्ये जाण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. मुंबई आता पॉइंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे.

Comments
Add Comment