
६ दरवाजांवर १८ किलो सोन्याचा मुलामा चढवण्याचे काम सुरु
अयोध्या : वर्षभरापूर्वी राम मंदिराच्या (Ayodhya Ram Mandir) तळमजल्यावरील १४ दरवाज्यांवर सोने बसवण्यात आले होते. प्रत्येक दरवाजावर सुमारे ३ किलो सोने वापरले गेले आहे. त्यानंतर यंदा जून महिन्यात राम दरबाराचा अभिषेक करण्यात येणार असून मंदिर प्रशासन ३ दिवस हा उत्सव साजरा करण्याची तयारी करत आहे. या पार्श्वभूमीवर ट्रस्टने मंदिराचे काम हाती घेतले आहे. प्रभू श्री रामाचं सिंहासन आणि त्यांचं द्वार सोन्याचं असावं, अशी भाविकांची इच्छा असल्याने श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने राम मंदिर संपूर्णत: सोन्याने मढवणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली : जगाची चिंता वाढवणारी मोठी बातमी समोर आली आहे. रशियाने (Russia Satellight) १९७२ साली शुक्र ग्रहासाठी पाठवलेला 'कोस्मस ४८२' नावाचा उपग्रह (Kosmos 482 Venus Lander) ...
मंदिर ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, राम मंदिराच्या दरवाज्यांवर सोन्याचा मुलामा लावण्याचे काम पुन्हा सुरू झाले आहे. आता पहिल्या मजल्याच्या ६ दरवाज्यांवर १८ किलो सोन्याचा मुलामा चढवला जात आहे. प्रत्येक दरवाजावर ३ किलो सोने वापरले जाईल. मुख्य कलश आणि राम दरबाराच्या सिंहासनावरही सोने लावले जाईल. त्यावर ३ ते ४ किलो सोन्याचा मुलामा चढवला जाईल, असे सांगण्यात आले आहे.
सागवानी लाकडावर तांब्याच्या थरानंतर सोन्याचा थर
राम मंदिराचे दरवाजे महाराष्ट्रातील चंद्रपूर येथून आणलेल्या सागवान लाकडापासून बनवले आहेत. त्यावर प्रथम तांब्याचा थर लावण्यात आला. आता सोन्याचा थर लावण्यात आला आहे. या दरवाज्यांवर दोन हत्ती कमळाच्या फुलांवर पाणी घालताना दिसतात. दरवाजाच्या दोन्ही बाजूला जय आणि विजयाची चिन्हे बनवलेली आहेत. गुरुवारी पहिल्या मजल्यावर दरवाजे बसवण्याचे काम सुरू करण्यात आले. राम मंदिराच्या ४ फूट कलशावर सोने चढवण्याची तयारी पूर्ण झाली आहे. हे काम पुढील ३ दिवसांत पूर्ण होईल.
मंदिराच्या मुख्य शिखरावर ४२ फूट उंच ध्वजस्तंभ स्थापित
यापूर्वी मंगळवारी, वैशाख तृतीयेच्या दिवशी, मंदिराच्या मुख्य शिखरावर ४२ फूट उंच ध्वजस्तंभ स्थापित करण्यात आला होता. त्यामुळे मंदिराची एकूण उंची आता २०३ फूट झाली आहे. सरचिटणीस चंपत राय म्हणाले की, एल अँड टी आणि टीसीएसच्या अभियांत्रिकी पथकाने ट्रॉली आणि दोन टॉवर क्रेनच्या मदतीने १६१ फूट उंच शिखरावर ध्वजस्तंभ उचलून बसवला. गुजरातच्या भरत भाई कंपनीने मंदिराच्या पावित्र्याला आणि भव्यतेला अनुसरून एका खास डिझाइनसह ध्वजस्तंभ तयार केला आहे.