Saturday, May 24, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

अंबानी कुटुंबातील 'या' सदस्याचा मृत्यू, पसरली शोककळा

अंबानी कुटुंबातील 'या' सदस्याचा मृत्यू, पसरली शोककळा

मुंबई: अंबानी कुटुंबातील लग्न असो वा इतर कोणतेही कार्यक्रम असो, त्याची चर्चा सर्वत्रच होते. मात्र यंदा हे कुटुंब दुःखात आहे. याचे कारण म्हणजे, त्यांचा लाडका पाळीव कुत्रा 'हॅपी'चे नुकतेच निधन झाले आहे. हॅप्पी अनंत अंबानीच्या खूप जवळ होता आणि कुटुंबातील एखाद्या सदस्यापेक्षा कमी नव्हता.


अनंत अंबानी यांचा पाळीव कुत्रा हॅपी याचे ३० एप्रिल रोजी निधन झाले. हॅपी हा अंबानी कुटुंबातील एक भाग होता, ज्याला ते घरातील सर्वात प्रिय सदस्यांपैकी एक मानत होते. अंबानी कुटुंबाच्या कौटुंबिक फोटोंमध्ये, लग्नाच्या कार्यक्रमांमध्ये आणि कौटुंबिक मेळाव्यांमध्ये हॅप्पीचे विशेष स्थान होते. पण आता संपूर्ण कुटुंब त्याच्या जाण्याने दुःखी झाले आहे.



अंबानी कुटुंबाकडून हॅपीला श्रद्धांजली





 










View this post on Instagram























 

A post shared by Ambani Family (@ambani_update)





हॅप्पीच्या निधनानंतर त्याची माहिती सोशल मीडियावर शेअर करताना अंबानी कुटुंबांनी सुंदर पोस्ट शेअर केली. अंबानी कुटुंबाने हॅप्पीचा पोस्टर बनवला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला. ज्यात त्यांनी लिहिले, 'प्रिय हॅप्पी, तू नेहमीच आमचा भाग राहशील आणि आमच्या हृदयात जिवंत राहशील.' या पोस्टच्या खाली अंबानी कुटुंबाचे चाहतेही प्रतिक्रिया देत असून, संवेदन व्यक्त करत आहेत.



हॅपीची आलिशान जीवनशैली


अनंत अंबानीच्या लाडक्या पाळीव प्राण्यांच्या यादीत हॅप्पी पहिल्या स्थानावर होतात. त्यामुळे आशियाईतील सर्वात श्रीमंत घराण्यातील पाळीव कुत्र्याची जीवनशैली कशी असेल याचा अंदाज तुम्ही लावू शकता. अनंत अंबानी जिथे जाईल तिथे हॅपी त्याच्यासोबत खाजगी जेटमधून प्रवास करत असे.


अंबानी कुटुंबात या पाळीव कुत्र्याला कुटुंबातील सदस्यासारखे वागवले जाते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अंबानी कुटुंबाचा पाळीव कुत्रा हॅपी ४ कोटी रुपये किमतीच्या मर्सिडीज-बेंझ जी ४००डी मध्ये फिरतो. अंबानी कुटुंबाच्या सुरक्षेत G 63 AMG सारख्या उच्च दर्जाच्या वाहनांचा समावेश आहे, तर G 400d हे पाळीव कुत्र्याच्या हॅपीच्या सुरक्षेसाठी आहे. मर्सिडीज-बेंझ जी ४००डी येण्यापूर्वी, हॅपी टोयोटा फॉर्च्युनर आणि टोयोटा वेलफायमधून फिरत असे.

Comments
Add Comment