
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली, मग ते ईशान्य भारत असो, डाव्या विचारसरणीच्या अतिरेक्यांचा प्रदेश असो किंवा काश्मीरमधील दहशतवाद असो आम्ही प्रत्येकाला प्रत्युत्तर देत आहोत. जर कोणाला वाटत असेल की हल्ला केला आणि ते जिंकले तर तो त्यांचा भ्रम आहे. त्यांना शोधून काढून आणि वेचून मारू. हा नरेंद्र मोदींचा भारत आहे. एक - एक करुन बदला घेतला जाईल. कोणालाही सोडले जाणार नाही; असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले. दहशतवाद संपेपर्यंत लढा सुरू राहील. ज्यांनी पहलगाममध्ये नागरिकांची हत्या केली त्यांना शिक्षा होईल. परिणाम भोगावेच लागतील, असा इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिला. काश्मीरमध्ये ९० च्या दशकापासून दहशतवाद आहे. पण मोदी सरकार दहशतवादाच्या विरोधात शून्य सहनशीलतेचे धोरण राबवत आहे. नागरिकांचे प्राण घेणाऱ्यांना परिणाम भोगावे लागतील. दहशतवादाविरुद्धची लढाई म्हणजे मोठ्या प्रवासातील एक टप्पा आहे. प्रत्येकाला योग्य वेळी योग्य पद्धतीने उत्तर दिले जाईल; असे अमित शाह यांनी सांगितले. देशाच्या कानाकोपऱ्यातून दहशतवादाचा बीमोड केला जाईल, असेही अमित शाह म्हणाले. दहशतवादाच्या विरोधात लढण्यासाठी भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक देशांचा पाठिंबा मिळत असल्याचे गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले. संपूर्ण जग भारताच्या बाजूने उभे आहे. दहशतवादाला तोंड देण्यासाठी जगातील अनेक देश एकत्र येत असून ते भारताच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहत आहेत; असे अमित शाह म्हणाले. याआधी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी अतिरेकी हल्ल्यात २५ पर्यटक आणि एक स्थानिक अशा २६ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर केंद्राकडून तातडीने अमित शाह जम्मू काश्मीरमध्ये पोहोचले होते. त्यांनी पहलगाम येथील हल्ल्याच्या ठिकाणी पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच मृतांना श्रद्धांजली वाहताना दहशतवाद्यांना धडा शिकविणार असल्याचे जाहीर केले होते.Bodofa Upendranath Brahma Ji dedicated his entire life to the progress of the Bodo community in Assam. It is a matter of immense joy that today his statue is being unveiled and a road is being dedicated in his honour in New Delhi. https://t.co/i5KVVR1XOz
— Amit Shah (@AmitShah) May 1, 2025