Shikhar Dhawan Slams Shahid Afridi: शिखर धवनने शाहिद आफ्रिदीला फटकारले, म्हणाला "आधीच पातळी सोडली आहे आता अजून..."

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ल्याविरुद्ध भारतीय जनतेचा राग शिगेला पोहोचला आहे. जगभरातून या हल्ल्याचा निषेध व्यक्त होत असताना, माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) केलेले भारतीय सैन्यावरील वादग्रस्त विधानामुळे अनेकांचे रक्त खवळलं आहे. ज्याला, शिखर धवनकडून (Shikhar Dhawan) चोख प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.


पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात २६ लोकांनी आपले प्राण गमावले, ज्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने दहशतवाद आणि दहशतवादी संघटनांना समर्थन देणाऱ्या पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाईला सुरुवात केली आहे. दरम्यान, पाकिस्ताननेदेखील भारतविरुद्ध गरळ ओकायला सुरूवात केली आहे. यात भर म्हणून की काय, पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने देखील भारतीय सैन्याविरुद्ध वादग्रस्त विधान केले होते. ज्याचा शिखर धवनने चांगलाचा समाचार घेतला आहे.



काय म्हणाला शिखर धवन?


धवनने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर)वर शाहिद आफ्रिदील टॅग करत म्हंटले की, "आम्ही तुम्हाला कारगिलमध्येही हरवलं होतं. आधीच पातळी सोडली आहे आता अजून किती पातळी सोडणार, उगाचच कमेंट्स करण्यापेक्षा तुमच्या देशाच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा." पुढे धवनने "आम्हाला आमच्या भारतीय सैन्याचा खूप अभिमान आहे. भारत माता की जय! जय हिंद!" असे देखील लिहिले.



काय म्हणालेला शाहिद आफ्रिदी?


शाहीद आफ्रिदीने सामा टीव्हीवर मुलाखत देताना भारतीय सैन्याविरुद्ध संतापजनक वक्त्यव्य केलं होतं. तो म्हणाला की, "जर जम्मू काश्मीरमध्ये फटाके जरी फुटले तरी ते पाकिस्तानने केले आहे, असे बोलले जाते. काश्मीरमध्ये तुमचे ८० हजार सैनिक आहेत आणि तरीही हा हल्ला घडला. याचा अर्थ तुम्हीकाहीच कामाचे नाही आहात, कारण तुम्ही लोकांना सुरक्षा देऊ शकत नाही."


केंद्र सरकारने शोएब अख्तरचं (Shoaib Akhtar) युट्यूब चॅनेल ब्लॉक केल असून, त्यासोबत इतर १५ युट्युब चॅनलचे भारतातील प्रसारण देखील रोखले आहेत.


ज्यामध्ये डॉन न्यूज, समा टीव्ही, एआरवाय न्यूज, बोल न्यूज, रफ्तार, जिओ न्यूज आणि सुनो न्यूज सारख्या प्रमुख पाकिस्तानी न्यूज चॅनेलचा समावेश आहे. या सर्व चॅनेलवर भारताबद्दल चुकीची माहिती प्रसारित करणे आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचा आरोप आहे.

Comments
Add Comment

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma :घटस्फोटानंतर पुन्हा एकत्र येणार ? चहल म्हणाला..

Yuzvendra Chahal-Dhanshree Verma : भारतीय क्रिकेटपटू युजवेंद्र चहल आणि चहलची पुर्व पत्नी हे ईनफ्लुन्सर धनश्री वर्मा हे दोघेजन पुन्हा

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर दुटप्पी!

मोहम्मद कैफ याचे संघ व्यवस्थापनावरही गंभीर आरोप नवी दिल्ली : न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय

मुंबई इंडिन्सचा गुजरात जायंट्सवर सात बळी राखून विजय

कर्णधार हरमनप्रित कौरची आक्रमक खेळी नवी मुंबई : विजयासाठी १९३ धावांचे आव्हान घेवून मैदानात उतरलेल्या मुंबई

शिखर धवनच्या आयुष्यात नवी इनिंग! सोफी शाइनसोबत उरकला साखरपुडा

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर शिखर धवनने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा गाठत

आयसीसी क्रमवारीतील अव्वल स्थानाकडे विराट कोहलीची वाटचाल

वडोदरा : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानाला आता धोका

महिला प्रीमियर लीग: हरमनप्रीत-सायव्हरचा झंझावात

मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर ५० धावांनी विजय मुंबई : वानखेडे स्टेडियमवर महिला प्रीमियर लीगच्या तीसऱ्या