Saturday, October 18, 2025
Happy Diwali

मुंबईतील प्रमुख रेल्वे स्थानकांतून सुटणाऱ्या मेल-एक्सप्रेस वेळापत्रकासाठी क्यूआर कोड प्रणाली

मुंबईतील प्रमुख रेल्वे स्थानकांतून सुटणाऱ्या मेल-एक्सप्रेस वेळापत्रकासाठी क्यूआर कोड प्रणाली

मुंबई : मध्य रेल्वे, मुंबई विभागाने प्रवाशांना आवश्यक प्रवास तपशील जलद आणि सोयीस्करपणे उपलब्ध करून देण्यासाठी क्यूआर कोड-आधारित माहिती प्रणाली सुरू केली आहे. या नवीन उपक्रमाचा उद्देश साध्या स्कॅनद्वारे रिअल-टाइम माहितीसाठी विनाअडथळा सहज वापर करून प्रवासाचा अनुभव वाढवणे हा आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) आणि पनवेल येथून निघणारे प्रवासी आता स्थानकांवर उपलब्ध असलेला क्यूआर कोड स्कॅन करून पुढील गोष्टी पाहू शकतात: * मेल/एक्सप्रेस गाड्यांसाठी ट्रेनचे वेळापत्रक * प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) नियम * मार्ग नकाशा * मध्य रेल्वेचे अधिकृत संकेतस्थळ * तक्रार निवारण आणि मदतीसाठी रेल मदद पोर्टल प्रवाशांच्या सोयीसाठी ही माहिती मराठी, इंग्रजी, हिंदी या तीन भाषांमध्ये उपलब्ध आहे.

Comments
Add Comment