Saturday, October 25, 2025
Happy Diwali

‘प्रहार’ची वेबसाईट आता नव्या रंगात आणि ढंगात…!

‘प्रहार’ची वेबसाईट आता नव्या रंगात आणि ढंगात…!

आपल्या विश्वासाचा ‘प्रहार’ आता तुमच्यासमोर नव्या रूपात!

मुंबई : अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ‘प्रहार’ दैनिकाची अधिकृत वेबसाईट www.prahaar.in आता एकदम नव्या रंगसंगतीत, आकर्षक लेआऊटसह आणि अधिक वापरकर्ता-सुलभ पद्धतीने सादर केली आहे. वाचकांच्या अभिप्रायांवर आधारित अनेक नव्या सुविधा आणि सुधारणांसह ही वेबसाईट पुन्हा सजली आहे.

नवे डिझाईन अधिक स्पष्ट, नेटके आणि मोबाईल व संगणक दोन्हीवर सहज वाचता येईल असे आहे. बातम्यांचे विभाग आता अधिक सुबकपणे मांडले गेले आहेत, थेट लाईव्ह अपडेट्स, व्हिडिओ बातम्या, पॉडकास्ट, तसेच तुमच्या आवडीच्या बातम्यांचा विशेष संग्रह — हे सगळं आता एका क्लिकवर!

तुमचं मत आम्हाला मोलाचं आहे!

ही नवी वेबसाईट तुम्हाला कशी वाटली? अजून काय सुधारणा अपेक्षित आहेत? कोणते विभाग अधिक आकर्षक झालेत? हे सगळं आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा.

तुमच्या सूचना आम्ही नक्कीच विचारात घेऊ आणि प्रहारची वेबसाईट अजूनही तुमच्यासाठी अधिक उपयुक्त आणि प्रभावी बनवत राहू.

शब्दांना सत्याची धार असलेल्या दैनिक प्रहारचे संकेतस्थळ www.prahaar.in — मधील बातम्या... तुमच्या भाषेत, तुमच्या मते, तुमच्यासाठी!

यात आहे.. ब्रेकींग न्यूज, ताज्या घडामोडी, महामुंबई, महाराष्ट्र, देश, विदेश, कला, क्रिडा, आयपीएल, Life style, अर्थविश्व, संपादकीय विशेष लेख, क्राईम, व्हिडिओ, मनोरंजन आणि साप्ताहिक पुरवण्यांची मेजवानी.

Comments
Add Comment