Friday, May 9, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

फणसाळकर यांच्या निवृत्तीनंतर, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी देवेन भारती यांची नियुक्ती

फणसाळकर यांच्या निवृत्तीनंतर, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी देवेन भारती यांची नियुक्ती

मुंबई: विवेक फणसाळकरांच्या निवृत्तीनंतर देवेन भारती यांच्याकडे मुंबई पोलीस आयुक्तपद देण्यात आलं आहे. ते सध्या मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त आहेत.


विवेक फणसाळकर यांनी 30 जून 2022 मध्ये मुंबई पोलीस आयुक्तपदाची धुरा स्वीकारली होती, त्यानंतर ते आज 30 एप्रिल रोजी सेवानिवृत्त झाले. फणसाळकरांच्या निवृत्तीनंतर आयुक्तपदासाठी सदानंद दाते, संजयकुमार वर्मा, रितेश कुमार, महिला पोलीस अधिकारी अर्चना त्यागी यांच्या नावाची चर्चा होती. याशिवाय देवेन भारती यांच्याकडेही या पदाची धुरा दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.


कोण आहेत देवेन भारती?


देवेन भारती हे बिहारचे रहिवासी आहेत. बिहारमधील दरभंगा येथील रहिवासी असलेल्या भारतीने दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून पदवी प्राप्त केली आहे. देवेन भारती हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात.  सुमारे तीन दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी मुंबई पोलिसात अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत.


देवेन भारती यांनी मुंबईत विशेष पोलीस आयुक्त, संयुक्त पोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था), आणि अँटी-टेररिझम स्वॉड (ATS) चे प्रमुख म्हणून काम केले आहे.


देवेन भारती यांचा २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासासह अनेक मोठ्या गुन्ह्यांच्या तपासात समावेश आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे मुंबई पोलीस दलात महत्वपूर्ण बदल अपेक्षित आहे.



विवेक फणसाळकर यांना देण्यात आला गार्ड ऑफ ऑनर


 



 










View this post on Instagram























 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)





मुंबई पोलिसांच्या परंपरेनुसार,फणसाळकरां यांच्या कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. त्यांच्या निवृत्तीनंतर, पोलिस मुख्यालयातील आयपीएस अधिकारी त्यांना निरोप देताना दिसले. एक परंपरा देखील पाळली जाते ज्यामध्ये निवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्याला उघड्या जीपमध्ये बसवले जाते. 


Comments
Add Comment