Sanjay Dutt : अभिनेता संजय दत्त म्हणतो, मी खरा भूत पाहिलाय अन् तेव्हा मी नशेतही नव्हतो!

मुंबई : अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) याचा 'द भूतनी' हा चित्रपट १ मे पासून लोकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातील 'आया रे बाबा' हे गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं. दरम्यान, गाण्याच्या प्रमोशन वेळी संजय दत्तला विचारण्यात आलेल्या प्रश्नांची त्याने मजेशीर उत्तर दिली.


"आम्ही तुम्हाला रफ अँड टफ आणि दमदार भूमिकेत पाहात आलो आहोत. मात्र, जीवनात कधी भीती वाटलीये किंवा एखाद्या गोष्टीची भिती वाटलीये, असा कधी क्षण आलाय का?" असा सवाल संजय दत्त यांना विचारण्यात आला होता. यावर संजय दत्तने मजेशीर उत्तर दिलं. या प्रश्नाचे उत्तर देताना संजय दत्त म्हणाला, "मी दोन-तीन वेळेस भूत पाहिले आहेत. एकदा मी निकला देखील बोललो होतो आणि एक माझ्या बिल्डिंगमध्ये कधी कधी लुंगी वाला रात्री २-३ वाजता उभा राहतो. तर असे अनुभव आले आहेत. तेव्हा मी नशेत देखील नव्हतो"



"द भूतनी" या चित्रपटात हॉरर, कॉमेडी आणि अ‍ॅक्शनचा मसाला पाहायला मिळणार आहे. सिनेमाच्या स्टोरीमध्ये एक झाड आहे, ज्यामध्ये एक भूतनी (मौनी रॉय) असते. संजय दत्त या "बाबा"च्या भूमिकेत आहे, तो भूताला पळवणारा आहे. चित्रपटात पाच अ‍ॅक्शन सीन्स आहेत, ज्यामध्ये संजय दत्त यांनी कोणत्याही बॉडी डबलचा वापर न करता स्वतः स्टंट्स केले आहेत.​ महाशिवरात्रीच्या दिवशी, २६ फेब्रुवारी २०२५ रोजी, "द भूतनी" चा टीझर रिलीज करण्यात आला होता. टीझरमध्ये संजय दत्त एका श्लोकाचा उच्चार करताना दिसतात, ज्यामुळे एक रहस्यमय वातावरण तयार होते.


टीझरमध्ये झाडावर वसलेली भूतनी आणि संजय दत्त यांच्यातील संघर्षाचे दृश्य दाखवले आहे.​ "द भूतनी" हा सिनेमा संजय दत्तच्या चाहत्यांसाठी एक वेगळा अनुभव देणारा आहे. जर तुम्हाला हॉरर आणि कॉमेडीचा मसाला असलेल्या फिल्म्स आवडत असतील, तर ही फिल्म नक्कीच पाहण्यासारखी आहे.​

Comments
Add Comment

‘एकाकी’मधील जॉनर बदलासाठी आशिष चंचलानीचे एस.एस. राजामौलींने केले कौतुक

आशिष चंचलानी, जे भारतातील सर्वात मोठ्या डिजिटल स्टार्सपैकी एक आहेत आणि ज्यांची देशभरात जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे,

साऊथचे सुपरस्टार 'रजनीकांत' चे काय आहे खरे नाव ?

रजनीकांत म्हणून ओळखले जाणारे दाक्षिणात्य तसेच हिंदी चित्रपटांमद्धे नावाजलेले असे ,'थलायवा' अर्थात रजनीकांत

यंग आर्टिस्ट स्कॉलरशीप

करिअर : सुरेश वांदिले यंग आर्टिस्ट स्कॉलरशीप या शिष्यवृत्तीचा कालावधी दोन वर्षांचा आहे. या कालावधीत संबंधित

व्ही. शांताराम चित्रपटातील जयश्रीच्या भूमिकेत तमन्ना भाटिया

भारतीय सिनेमातील महान दिग्दर्शक आणि निर्माता शांताराम राजाराम वणकुद्रे (व्ही. शांताराम) यांच्या जीवनावर आधारित

हेमंत ढोमे यांच्या शाळेत ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’चा संगीत अनावरण सोहळा

रत्नाकर मतकरींचं ‘स्वर्गात आकाशगंगा’ नव्या अंदाजात ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ चित्रपटातील

हृषिकेश जोशींच्या ‘बोलविता धनी’ नाटकासाठी क्षितीश दाते सज्ज!

प्रसिद्ध अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक हृषिकेश जोशी यांच्या आगामी 'बोलविता धनी' या नाटकाची सध्या नाट्यवर्तुळात