Tuesday, April 29, 2025

महामुंबईमहाराष्ट्रब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

'पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या नातलगांना ५० लाखांची मदत देणार'

'पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या नातलगांना ५० लाखांची मदत देणार' मुंबई : पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. राज्य सरकार या कुटुंबांच्या शिक्षण आणि रोजगाराच्या गरजांवरही लक्ष केंद्रित करेल. जगदाळे कुटुंबातील मुलीला सरकारी नोकरी दिली जाई; असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला होता. यात डोंबिवलीच्या तीन, पुण्याच्या दोन आणि पनवेलच्या एका नागरिकाचा समावेश होता. या सहा जणांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत देत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत पहलगाम हल्ल्यातील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर राज्यातील सहा मृतांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली.
पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले महाराष्ट्रातील सहा जण
  1. अतुल मोने, डोंबिवली
  2. संजय लेले, डोंबिवली
  3. हेमंत जोशी, डोंबिवली
  4. संतोष जगदाळे, पुणे
  5. कौस्तुभ गणबोटे, पुणे
  6. दिलीप देसले, पनवेल
Comments
Add Comment