Tuesday, April 29, 2025
Homeताज्या घडामोडीमिठी नदी : एसआयटीने पालिकेकडे मागितली कंत्राटदारांची माहिती

मिठी नदी : एसआयटीने पालिकेकडे मागितली कंत्राटदारांची माहिती

कामांसाठी नेमलेल्या कंपन्यांची होणार चौकशी

मुंबई (प्रतिनिधी): मिठी नदीतील गाळ काढण्याच्या कामांमध्ये अनियमिता दिसून आल्याने पाची चौकशी सुरू आहे. या चौकशी अंतर्गत आता आर्थिक गुन्हे विभागाने आता थेट महापालिकेच्या पर्जन्य जलअभियंता विभागाला पत्र पाठवून कंत्राटदार कंपन्यांचे पत्ते आणि संचालकांची नावेच सादर करण्याची मागणी केली आहे. सन २००६ पासून सन २०२३-२४ या कालावधीमध्ये काम करणाऱ्या तब्बल ५१ कंत्राट कंपन्यांची यादीच सादर करत यासर्वाच्या कंपन्यांचे पत्ते आणि संचालकांची माहिती द्यावी असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी तसेच तिच्या अन्य कामांसाठी जवळपास १३०० कोटींहून अधिक केलेल्या कथित खर्चाच्या चौकशीसाठी आर्थिक गुन्हे शाखेने २० सदस्यीय विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने हो एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. सन २००५ पासून मिठी नदीचे काम सुरू आहे. तब्बल १८ वर्षे उलटूनही मिठी नदीचे काम का सुरू आहे असा प्रश्न विधीमंडळात उपस्थित केला होता, त्यानुसार ही एसआयटी स्थापन केली होती.

यासंदर्भात एसआयटी मार्फत चौकशी सुरू असून मागील २३ एप्रिल २०२५ रोजी मुख्य अभियंता पर्जन्य जलवाहिनी विभागाला पत्र पाठवले आहे. वामध्ये आर्थिक गुन्हे विभागाने मिठी नदीतील गाळ टाकण्याच्या कामासंदर्भातील कंत्राटदार कंपन्यांचे पत्ते तसेच त्यांच्या संचालक यांची नावे सादर करण्यात यावी असे नमुद केले आहे. यामध्ये आर्थिक गुन्हे विभागाने सन २००६ पासून ते सन २०२३-२४ पर्यंत काम केलेल्या सर्व कंत्राटदार कंपन्यांची यादीच या पत्रात जोडून संबंधित कंपन्यांचा पत्ता, तसेच त्यांचे संचालक आणि त्यांचे संपर्क क्रमांक मागितल्याची माहिती मिळत आहे. सुरुवातीला मिठी नदीचा विकास तसेच गाळ काढण्याचे काम एमएमआरडीए आणि महापालिका प्रशासन आपापल्या हद्दीत करत असे. त्यानंतर सन २०१४ नंतर मिठी नदीची संपूर्ण जवाचदारी महापालिकेवर सोपवण्यात आल्याने याची सफाई ही महापालिकेच्या वतीने कंत्राटदार नियुक्त करून त्यांच्या मार्फत केली जाते. त्यामुळे आर्थिक गुन्हे विभाग आता महापालिकेपर्यंत पोहोचली असून सर्व कंत्राटदारांची सर्वकष माहिती गोळा करण्यास सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पाची विचारणी केली असता त्यांनी याला दुजोराही दिला असून यासाठी जी एसआयटी स्थापन झाली आहे, त्यानुसार आर्थिक गुन्हे विभागाने पत्र पाठवले आहे, त्यांना योग्य ते सहकार्य केले जाईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -