श्रुती गोखले यांचा जन्म एका बाळबोध, मध्यम वर्गीय घरात, कुलकर्णी कुटुंबात पुण्यात झाला. आईला शिक्षणाची खूप आवड होती, पण तो काळ, बायकांचे जग म्हणजे स्वयंपाक घर, रिती रिवाज, हौसमौज म्हणजे सणवार साजरे करणे असा होता. घरात मुलगा-मुलगी हा भेदभाव कायम होता.
त्यावेळी लोहगाव विमानतळावर विमानांचे प्रदर्शन होते. ५ रुपये तिकीट होते. त्यांना विमानांचे जबरदस्त वेड होते. पण वडील म्हणाले, तू कशाला येतेस. तू थोडीच बसणारेस विमानात? याला उपयोग होईल आणि ते भावाला घेऊन प्रदर्शन बघायला गेले. त्यावेळी आई सहजपणे म्हणाली ‘काय माहीत पुढे भविष्यात हीच विमानात पहिली बसेल आणि तुम्हालाही घेऊन जाईल! आणि खरोखर नकळत बोलून गेलेले तिचे शब्द खरे ठरले. त्याचवेळी त्यांच्या मनावर नकळत कोरले गेले की खूप शिक्षण घ्यायचे आणि जीवनात काहीतरी वेगळे करून दाखवायचे. आईने प्रोत्साहन दिले. शालेय शिक्षण पूर्ण करून Greaves Cotton मध्ये नोकरीही लागली आणि वडिलांनी लग्न ठरवून टाकले. त्या कुलकर्ण्यांची गोखले झाल्या. सासुबाई, पती जयंत सुधारणावादी होते. त्यांनी सासूबाईंना सांगितले की, मला पुढे शिकायची इच्छा आहे, MCom करायचे आहे, त्या म्हणाल्या, तू खुशाल तुला पाहिजे तेवढे शिक.
त्याचवेळी त्यांच्या पतींना ओमानमध्ये नोकरीची संधी चालून आली. आठ महिन्यानंतर त्याही ओमानला गेल्या. तिथ एक दिवस परिचिताने विचारले की एका contracting कंपनीत अकाऊंटंटची पोस्ट रिकामी आहे, तर नोकरी करणार का? इलेक्ट्रो मेकॅनिकल कंपनी होती व मालक भारतीय होते किणी. कामाला सुरुवात केली. कंपनी म्हणजे एक मोठा गोंधळ होता. कसलाच ताळमेळ नव्हता. त्यांनी पुण्याला नोकरी केली होती. अनुभव होता. कंपनीचे चेअरमन उपेंद्र माधव किणी. त्यांना त्या काळी ओमानमध्ये ‘मिनी सुलतान’ म्हणत असत. त्यांच्या १६ कंपन्या होत्या. २५००/३००० कामगार काम करत होते. वयाच्या ४०व्या वर्षीच त्यांनी एक यशस्वी उदयोजक म्हणून नाव मिळवले होते.
एक दिवस ते ऑफिसमध्ये आले आणि त्यांनी श्रुती यांना बोलावले आणि विचारले तुम्ही मिसेस गोखले का ? तुम्ही चीफ अकाऊंटंट व्हाल का? त्या म्हणाल्या, “माझी तयारी आहे. आत्ता पण मीच सर्व काम करते, मी करत असलेल्या कामाचा पूर्ण मोबदला मात्र मला मिळत नाही. मला माझ्या कामाचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे. तरच मी कामाला तयार आहे.” त्यांना स्टाफकडून अशा प्रकारच्या उत्तराची सवय नसावी. त्यांनी मला विचारले. आत्ता किती मिळतात १०० रियाल. आता २५० रियाल मिळायला हवेत. त्यांनी मान्य केले आणि चीफ अकाऊंटंट म्हणून त्यांनी कंपनीचे काम बघण्यास सुरुवात केली.
त्यांनी बारीक सारीक सुधारणा कंपनीत केल्या. ऑफिसला एक शिस्त लागली. कंपनीत आमूलाग्र बदल झाले आणि १ electrical contracting GCC shop floor CA door to door fencing .९८५ मध्ये ही कंपनी ओमानमधील नंबर एक electrical contracting कंपनी ठरली. ओमानमध्ये, किणींनी ८२मध्ये फेन्सिंग बनवायची फॅक्टरी सुरू केली होती; परंतु हवे तसे यश आले नव्हते. मिस्टर किणींनी त्यांना त्यात लक्ष घालायला सांगितले, १९८५ मध्ये त्यातलं श्रुती यांना काही माहीत नव्हतं त्यावेळी त्यांनी सर्व स्टाफला गुरू बनवल, त्यांच्याकडून शिकून घेतलं आणि ती कंपनी भरभराटीला नेली. त्याच सुमारास प्रथमच ओमानमध्ये GCC मीटिंग होती. त्यासाठी तेथील सरकारने ६० मिलियन डॉलर खर्च केले. डबल रोड्स बनवले होते. अल बुस्तान हॉटेल बनवले. तो काळ असा होता की सर्वच कंपन्यांनी खूप प्रॉफिट केला. त्यांच्या कंपनीलासुद्धा चांगला प्रॉफिट झाल; परंतु १९८५ व ८६मध्ये ओमनी नोटांचं डीव्हॅल्युएशन झालं आणि सर्व कंपन्यांची अवस्था बिकट झाली. कधी काळी १६ कंपन्यांचा मालक असलेल्या किणींचे सेव्हिंग झिरोवर पोहोचले. म्हणून त्यानी दुबईला शिफ्ट व्हायचं ठरवलं. थोडे पैसे कीणी यांच्याकडचे, श्रुतीकडचे थोडे पैसे यातून जिद्दीने कंपनी सुरू केली. त्यांच्या पतीनेही त्यांना साथ दिली. ओमान सोडून १९८७ मध्ये ते सर्व नवी स्वप्ने घेऊन स्वप्ननगरी दुबईत आले. बऱ्याच प्रयत्नांनी त्यांची ‘लिंक मिडल ईस्ट’ ही कंपनी सुरू झाली. त्यांचे मिस्टर जयंत कंपनीचे कमर्शिअल डायरेक्टर झाले. ते shop floor आणि फॅक्टरीचे काम बघायचे, त्या फायनान्स आणि मार्केटिंग साईड बघत असत. किणी मदत करायचे, शिकवायचे. CA घेतले आणि १० कामगार घेतले आणि अक्षरशः door to door जात काम आहे का विचारत त्या फिरल्या. हळूहळू नfencing वीन कंपनी आकार घेऊ लागली, fencing आणि गेबीअन दोन उद्योग सुरू झाले. हळूहळू गेबीअनला इंटरनॅशनल मार्केट मिळायला लागले.
Gabion म्हणजे – हे एक इटालियन तंत्रज्ञान. एका इटालियन कंपनीने १८७४ मध्ये शोधून काढले होते. मिस्टर किणींना १९७७ मध्ये या टेक्नॉलॉजी बद्दल समजले आणि ते त्या कंपनीचे एजंट झाले होते. १९८५मध्ये त्यांनी इटालियन कंपनीला सांगितले की आता आमची कंपनी ही काम सुरू करत आहे. तुम्ही जॉईन व्हा, तर त्यांनी अशा तुच्छतेने पाहिले की तुम्ही इंडियन काय करणार? तुम्हाला ते जमणारच नाही. मग हे जिद्दीला पेटले. त्या जपानला जाऊन त्यांनी रिसर्च केला आणि मशिन तयार झाले आणि नंतर ते संपूर्ण जगात त्या इटालियन कंपनीचे एकमेव स्पर्धक ठरले. जवळ जवळ सर्व जग आत्तापर्यंत इटालियन कंपनीकडून माल घेत होते, पण श्रुती यांची कंपनी first fighter होते. त्यांना प्रथम वाटले, ही एकटी बाई. त्यातून इंडियन ही काय करणार, तिला जमणार नाही. पण त्यांना खात्री होती, प्रथम दुबई नंतर ओमान, सौदी, जॉर्डन, इराक, इकडे सिंगापूर, मलेशिया, इंडोनेशिया, थाय, तैवान, कोरिया अशा प्रकारे ९५ पर्यंत देश south east asia कॅप्चर केले. नंतर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, फिजी सर्वकडे उद्योग सुरू केले. ज्यावेळी युरोपमध्ये पंख पसरायला सुरुवात केली. तेव्हा हे इटालियन खूप चिडले. अक्षरशः वाईल्ड झाले. मिस्टर किणींना धमक्या येऊ लागल्या की आम्ही सर्व माफिया गँगचे आहोत. तुम्ही जर हे थांबवले नाहीत तर आम्ही तुम्हाला मारून टाकू. शेवटी श्रुती यांची कंपनी खुद्द सुलतान सुलेम यांच्याकडे गेले. सुलतान म्हणाले की तुम्ही निर्धास्तपणे तुमचे काम करा, इथे दुबईमध्ये तुमच्या केसाला ही कोणी धक्का लावणार नाही. एक भारतीय स्त्री काय करू शकते हे श्रुती यांनी त्यांना दाखवून दिले! आज Centor Electric tracting co ही दुबईतील नंबर एकची कंपनी झाली आहे. दरम्यान श्रुती यांच्यावर आभाळ कोसळलं. किणी यांचं दुर्दैवी निधन झालं; परंतु सर्व जबाबदारी अंगावर घेत त्यानी काम पुढे नेलं. Electrical Contracting co ही दुबईतील नंबर १ कंपनी आहे. व ८०० कामगार तिथे काम करतात आणि Link Middle East जगामध्ये ७०हून अधिक देशांमध्ये काम करत आहे. गेली ३० वर्षे ४०० मिलियन देरहमची कामे दरवर्षी ही कंपनी करते. कंपनीतील शेअर्स इ. सर्व कायदेशीरबाबी पूर्ण केल्या.
इतकच नाही तर कंपनी हे आपलं कुटुंब आहे आणि कुटुंबाच्या प्रत्येक सदस्याची काळजी घेणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. म्हणून कोणाची आजारपणं, कोणाला भारतात काही अडचण असेल तर सर्वतोपरी सहाय्य केले जाते. जर खरोखर कॅपेबल असतील तर त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेते, असं त्यांनी सांगितलं. या कामगारांच्या जोरावर खूप पैसा कमावला त्यामुळे त्यांच्यासाठी आणि गरिबांसाठी त्या मोठ्या प्रमाणावर काम करतात. केरळ मध्ये ८० निराधार बायकांना त्यांनी दत्तक घेतले आहे आणि त्यांची संपूर्ण जबाबदारी घेतली आहे. तसेच पुण्यामध्ये वृद्धाश्रमासाठी जागा घेतली आहे. आजच्या तरुणांना तुम्ही काय सल्ला द्याल? असं विचारलं असता त्या म्हणाल्या की त्यांच स्वतःच शिक्षण मराठी माध्यमातून झाले, यशामध्ये भाषा, जात, धर्म किंवा आर्थिक परिस्थिती कोणतीही गोष्ट माझ्या प्रगतीच्या आड आली नाही. आज जगामध्ये ७० देशांमध्ये आमची कंपनी काम करते, मी सर्व ठिकाणी साडी हा मराठी पेहेराव घालून power point presentation करायला उभी राहते, माझे इंग्रजी हे हायफाय इंग्रजी नाही, तर ते मराठी इंग्रजी आहे. पण हे काहीच आड येत नाही. कारण एकतर विषयाचे सखोल ज्ञान आणि जबरदस्त आत्मविश्वास. मी कॉम्प्युटर आणि त्या संबंधित सर्व गोष्टी शिकले ! बदलत्या काळानुसार आवश्यक ते शिक्षण घ्यायचे आणि काळाबरोबर राहायचे हे सूत्र लक्षात ठेवले आहे आणि म्हणूनच आजच्या विद्यार्थ्यांना त्याचबरोबर विशेषतः पालकांना मला सांगावेसे वाटते की, शिक्षणाच्या माध्यमाने काहीही फरक पडत नाही. आवश्यक आहे भविष्याचा वेध घेण्याची विचारशक्ती, जिद्द, मेहनत, आत्मविश्वास. हे असेल तर माणूस भारतात काय जगाच्या पाठीवर कुठेही यशस्वी उद्योजक होऊ शकतो हे श्रुती गोखले यांनी दाखवून दिलं आहे.
joshishibani@yahoo. com
मोखाडा : तालुक्यातील मातामृत्यू आणि बालमृत्यूच्या घटना थांबविण्यासाठी हवे तसे प्रयत्न होत नसल्याचे आता समोर…
मुंबई महापालिकेने बेस्टच्या भाडेवाढीला मंजुरी दिली असून यामुळे बेस्टला ५९० कोटी रुपयांचा वार्षिक महसूल प्राप्त…
अनिल आठल्ये, निवृत्त कर्नल, ज्येष्ठ अभ्यासक अमेरिकेच्या अध्यक्षांकडून नवनवीन धोरणांचा धडाका उडवला जात असताना जागतिक…
पंचांग आज मिती वैशाख शुद्ध द्वितीया शके १९४७. चंद्र नक्षत्र कृतिका. योग सौभाग्य. चंद्र राशी…
जयपूर: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४७व्या सामन्यात आज राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सवर ८ विकेट राखत…
मच्छिमारांच्या घरांसाठी केंद्राने भूमिका घ्यावी - मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मत्स्योत्पादनाचा…