मुंबई: मुले असो वा वयस्कर…प्रत्येकालाच आईस्क्रीम खायला आवडते. उन्हाळ्याच्या दिवसांत तर आईस्क्रीमचे सेवन सर्वाधिक केले जाते. कडाक्याच्या उन्हामध्ये गारेगार थंडावा देणारे आईस्क्रीम प्रत्येकाला आवडते. मात्र तुम्हाला माहीत आहे का की काही लोकांसाठी आईस्क्रीमचे सेवन खूप धोकादायक ठरू शकते. जाणून घ्या कोण आहेत ते ज्यांनी चुकूनही आईस्क्रीमचे सेवन करू नये.
डायबिटीज रुग्णांनी आईस्क्रीम खाऊ नये
आईस्क्रीम बनवण्यासाठी साखरेचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. अशातच जर तुम्ही डायबिटीजचे रुग्ण असाल तर हे खाण्यापासून दूर राहिले पाहिजे. याच्या सेवनामुळे शुगर लेव्हल अचानक वाढू शकते.
हृदयाच्या रुग्णांसाठी आईस्क्रीमचे सेवन नुकसानदायक
आईस्क्रीम बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात हानिकारक केमिकल्सचा वापर केला जातो. हे केमिकल्स हृदयासाठी हानिकारक आहेत. अशातच जर तुम्ही हृदयरोगी असाल तर याचे सेवन अजिबात करू नये.
दातांसाठी आईस्क्रीमचे नुकसान
आईस्क्रीमच्या अधिक सेवनाने दातांमध्ये कॅव्हिटी होण्याची समस्या अधिक वाढते. लक्ष न दिल्यास दातांच्या समस्या अधिक वाढू शकतात. अशातच दररोज आईस्क्रीम खात असाल तर ते कमी करा. तसेच आईस्क्रीम खाल्ले तर ब्रश करायला विसरू नका.