
मुंबई : मुंबईतील घाटकोपरमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. घाटकोपरमध्ये रात्रीच्या वेळी औषधाच्या दुकानातून औषध घेऊन परतणाऱ्या एका तृतीयपंथीला मारहाण करून, मद्य पाजून अत्याचार करण्यात आले. याबाबत पार्कसाईट पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

मुंबई : प्रेक्षकांना नेहमीच मनोरंजनासाठी चटपटीत मसालेदार कंटेन्ट हवा असतो. या स्पर्धेत मराठी चित्रपटांनी सगळ्याच बाबतीत आपलं वेगळेपण दाखवून दिलं ...
विक्रोळी येथील पार्क साईट परिसरात पीडित कुटुंबासोबत राहते. रविवारी (दि २७) मध्यरात्री ३ च्या सुमारास घाटकोपर परिसरातील एका औषधाच्या दुकानात ती औषध घेण्यासाठी एका सहकाऱ्यासोबत गेली होती. दोघेही औषध घेऊन घरी परत येत असताना त्यांना घाटकोपरमधील श्रेयस सिनेमा परिसरात मद्य प्राशन केलेल्या दोघांनी अडवले. यावेळी पीडित तृतीयपंथीच्या सहकाऱ्याने घटनास्थळावरून पळ काढला. एका आरोपीने पीडित तृतीयपंथीला पकडून जबरदस्ती मद्य पाजले. त्यानंतर काचेच्या बाटलीने तिच्या हातावर वार करून तिच्यावर अत्याचार करून पळ काढला.
पीडित तृतीयपंथीने ही बाब फोन करून तिच्या कुटुंबियांना सांगितली. तिच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी जाऊन जखमी तृतीयपंथीला घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच पार्कसाईट पोलिसांनी रुग्णालयात जाऊन तृतीयपंथीची भेट घेतली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी कृष्णा नावाच्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.