
मुंबई : वांद्रे येथे लिंकिंग रोडवरील लिंक स्क्वेअर मॉलमध्ये असलेल्या क्रोमा शो रूमला आग लागली. क्रोमाचे शो रूम हे एका मॉलसारखेच आहे. तीन भूमिगत मजले आणि जमिनीवर असलेले तीन मजले असे एकूण सहा मजल्यांवर हे शो रूम पसरले आहे. या मॉलच्या तळ मजल्याला आग लागली. थोडयाच वेळात ही आग पूर्ण शो रूममध्ये पसरली. या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही. पण वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे.

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांची मागणी मुंबई : किनारपट्टीवर राहत असलेल्या मच्छीमार समाजावर सातत्याने आपले घर सीआरझेड अंतर्गत तोडले ...
वांद्रे पश्चिमेला लिंकिंग रोड हा रस्त्यावरील खरेदी अर्थात स्ट्रीट शॉपिंगसाठी प्रसिद्ध आहे. यामुळे नागरिकांची रस्त्यावर कायम वर्दळ असते. शिवाय महत्त्वाचा रस्ता असल्यामुळे वाहनांची ये - जा पण सुरू असते. या कायम लगबग असलेल्या भागातील लिंक स्क्वेअर मॉलमधील क्रोमाच्या शो रूमला पहाटे सव्वा चार वाजता आग लागली. थोड्याच वेळात आग पसरली. आगीने रौद्र रुप धारण केले.
आग लागल्याची माहिती मिळताच मुंबई महापालिकेचे अग्निशमन दल, विभागीय अधिकारी - कर्मचारी, मुंबई पोलीस, अदानी इलेक्ट्रिक वितरण कंपनी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी असे मोठे पथक घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाने आसपासच्या इमारती रिकाम्या केल्या. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झाले. आग आटोक्यात आणण्यासाठी १२ मोटर पंपांसह तीन छोटी होज लाईन्स वापरण्यात आली. या घटनेत जीवितहानी झालेली नाही. पण वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे.