मुंबई(ज्ञानेश सावंत):अठराव्या हंगामातील पात्रता फेरीतील चढाओढ सध्या सुरू आहे. प्रत्येक संघ पात्रता फेरीतील आपले स्थान निश्चित करण्यासाठी प्रयत्नशील आहे. कालच्याच सामन्यात दिल्लीचा बेंगळुरूने ६ बळीनी पराभव केला. गुण तक्त्यात दिल्ली चौथ्या स्थानावर आहे व आजचा सामना जिंकणे त्यांना आवश्यक आहे. आजचा सामना घरच्या मैदानावर कोलकत्ता विरुद्ध होणार आहे.
कोलकत्याचा यापूर्वीचा सामना पावसामुळे अनिर्णित राहिला व त्यांना एक गुण मिळाला. कोलकत्त्याला देखील त्यांचे पात्रता फेरीतील आव्हान कायम ठेवण्यासाठी आजचा सामना जिंकणे गरजेचे आहे. कोलकत्त्याचा संघ फलंदाजीमुळे अडचणीत येत आहे. सलामीला डी-कॉक व गुरबाज चालत नाही आहेत तर मधल्या फळीत व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, मोईन अली हे सारेच खेळाडू एक मोठी खेळी करण्यात अपयशी ठरत आहेत.
आजचा सामना जिंकायचा असेल तर कोलकत्त्याला संघात काही बदल करावे लागतील. कोलकत्या समोर दिल्लीचा संघ नक्कीच ताकदवान आहे. त्यांची फलंदाजी, गोलंदाजी ही कोलकत्ता पेक्षा चांगली आहे. आणखी एक गोष्ट दिल्लीच्या संघात आहे ती म्हणजे ते रिस्क घ्यायला घाबरत नाहीत. गरजे नुसार ते त्यांच्या गोलंदाजी व फलंदाजी मध्ये बदल करतात. चला तर बघूया दिल्ली कालचा पराभवाचा बदला आज घेणार का?