Tuesday, April 29, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Breaking News : आंधळं प्रेम की जाळं? अहिल्यानगरमधून १३६ मुली अचानक बेपत्ता का?

Breaking News : आंधळं प्रेम की जाळं? अहिल्यानगरमधून १३६ मुली अचानक बेपत्ता का?

अहिल्यानगर : प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. याचं आंधळ्या प्रेमाला सोशल मीडियामुळे आणखी बळ मिळते. तरुणाई या आंधळ्या प्रेमामुळे अनेकदा चुकीचे निर्णय घेताना दिसते. फेब्रुवारी ते मार्च असा महाविद्यालयीन, शाळांचा परीक्षेचा काळ असतो. याच काळात अहिल्यानगर येथील १३६ मुली बेपत्ता झाल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत.

अहिल्यानगर मध्ये मुली बेपत्ता असल्याचं प्रकरण दिवसेंदिवस वाढत आहे. त्याची कारणे वेगवेगळी असली तरी प्रेमसंबंध हे प्रमुख कारण आहे. मात्र, अशाच काही घटनांमधून अघटित घटना घडल्याची उदाहरणे समोर आहेत. गेल्या दोन ते तीन महिन्यांचा आढावा घेतला तर तीन महिन्यांत सर्वाधिक मुली पळून गेल्या आहेत. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या महिन्यात दहावी, बारावीच्या परीक्षेचा काळ असतो. याच काळात नेमक्या मुली पळून गेल्या आहेत.

एका सर्वेक्षणामध्ये शाळकरी वयामध्ये एखाद्या मुलाबरोबर प्रेम जडणे आणि त्यातून मुलांच्या आमिषाला बळी पडून मुली पळून जाणे, सोशल मीडियाच्या माध्यमातून परराज्यातील एखाद्या मुलाबरोबर प्रेम जडणे, प्रेमाच्या आणाभाका घेणे, नंतर घरातून निघून जाणे असे साधारणपणे घडताना दिसते. कौटुंबिक आणि आर्थिक परिस्थिती ही कारणेदेखील त्यात समोर आली आहेत. गेल्या तीन महिन्यात जिल्ह्यातून १३६ मुली पळून गेल्या आहेत. त्यापैकी अवघ्या ७१ मुली सापडल्या आहेत. अन्य बेपत्ता मुलींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. दरम्यान या घटनेने नगर हादरले आहे.

Comments
Add Comment