
महिलांना किंवा मुलींना ब्लाऊजचे नवीन नवीन पॅटर्न शिवण्याची खूप आवड असते. कोणत्याही समारंभात साडी नवीन घेतली तर ब्लाऊज कसा शिवायचा हा प्रश्न पडतो. इतकंच नाही तर ब्लाऊजचे सेम सेम पॅटर्न नको म्हणून मुलींना काही तरी युनिक पॅटर्न हवे असतात. ब्लाऊजची मागची बाजू जर सुंदर आणि अधिक आकर्षक असेल तरच तो ब्लाऊज अगदी उठून दिसतो. ब्लाऊजचा बॅक चांगला दिसावा यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे गळे किंवा लटकन लावून अशा वेगवेगळ्या पॅटर्नचे ब्लाऊज शिवून घेतो. पण, आता नवीन पॅटर्न असा की ब्लाऊजला तुम्ही मागच्या बाजूने वेगवेगळ्या पॅटर्नच्या बो-नॉट शिवू शकता. चला तर मग या लेखातून जाणून घेऊया ब्लाऊजच्या मागच्या बाजूने तुम्ही कोणकोणत्या पॅटर्नचे बो-नॉट शिवू शकता...
१. रंगीबेरंगी ब्लाउज
जर तुमची साडी कॉटनमध्ये व्हाईट किंवा फिकट रंगाची असेल तर त्यासाठी तुम्ही असं रंगीबेरंगी ब्लाउज घेऊ शकता आणि त्याला मागून अशी सुंदरशी बो-नॉट शिवू शकता.
२. स्लिव्हलेस ब्लाऊज
तुम्ही जर हिरव्या रंगामध्ये जॉर्जेटची साडी परिधान करणार असाल तर यावर लाईट ब्राउन स्लिव्हलेस ब्लाऊज तुम्ही शिवू शकता. मागच्या बाजूने आकर्षक दिसण्यासाठी गोल्डन बॉर्डर आणि बो-नॉट लावून घेऊ शकता. तुमचा लूक सुंदर दिसेल.
३. सोबर ब्लाऊज
तुमची साडी एकदम सोबर डिझाइन्सची असेल तर त्यावर तुम्ही असं सुंदर ब्लाऊज शिवू शकता आणि त्याच्या मागच्या बाजूला मोठ्या आकाराचा बो-नॉट शिवू शकता. यावर तुमचे फोटो सुंदर येतील.
४. सफेद ब्लाऊज
सध्या कोणत्याही गडद रंगाच्या साडीवर महिला किंवा मुली सफेद रंगाचं ब्लाऊज रेडिमेन्ट तरी घेतात किंवा सफेद कापड घेऊन शिवतात. ह्या सफेद ब्लाऊजचा ट्रेंड मार्केटमध्ये फार पाहायला मिळतो. तुमच्याकडे सुद्धा एखादी गडद रंगाची साडी असेल तर तुम्ही एखादं चिकनकारी सफेद रंगाचं कापड घेऊन ब्लाउजच्या मागची बाजू अशी शिवा. अतिशय सुंदर आणि आकर्षक लूक दिसेल.
५. लॉन्ग स्लीव्ह ब्लाऊज
तुम्हाला लग्नसमारंभासाठी एखादी भरीव साडी परिधान करायची असेल तर त्याच ब्लाऊज अतिशय सोबर शिवायला पाहिजे. पुढून स्लिव्हलेस किंवा पूर्ण हाताचं शिवलात तर मागून एक बो-नॉट शिवा. केसांची हेअरस्टाईल मात्र रंगीबेरंगी गजरे माळून किंवा इतर कोणत्याही फुलांनी करा. मागून लूक खूप सुंदर दिसेल आणि तुमचे फोटोसुद्धा छान येतील.
६. नाजुकशी बो-नॉट
[caption id="attachment_923506" align="alignnone" width="200"]
बो-नॉटची डिझाईन इतकी प्रसिद्ध आ की साखरपुडा असो किंवा लग्न मुली हमखास ही डिझाईन पसंत करतात. साखरपुड्यासाठी ब्लाऊजची ही डिझाईन तुम्ही नक्कीच शिवू शकता. मागच्या बाजूने पानाच्या आकाराचा लांब गळा आणि नाजुकशी बो-नॉट शिवा अतिशय सुंदर पॅटर्न दिसेल.