Friday, October 24, 2025
Happy Diwali

राणीबागेत तब्बल ७० कोटी रुपये खर्च करून उभारणार मत्स्यालय

राणीबागेत तब्बल ७० कोटी रुपये खर्च करून उभारणार मत्स्यालय

मुंबई (खास प्रतिनिधी): भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालयात आता पेंग्विन कक्षाजवळ आंतराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय उभारले जाणार असून, आहे. या मत्स्यालयासाठी अखेर घुमटाकार तसेब पदभ्रमण मत्सालयात विविध प्रकारचे मासे न्याहाळता येणार कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे. यासाठी विविध करांसह तब्बल ७० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणी संग्रहालयातील अर्थात राणीबागेतील इंटरप्रिटेशन सेंटर इमारतीच्या आंतरराष्ट्रीय मानकानुसार मत्स्यालयाचे बांधकाम करण्याचा तळमजल्यावर अखेर कंत्राटदाराची निवड, लवकरच होणार कामाला सुरुवात निर्णय घेण्यात आल्यानंतर याची निविदा प्रक्रिया अंतिम करण्यात आली आहे. विद्यमान प्राणीसंग्रहालयातील जागेची मर्यादा लक्षात घेता, मासे तसेच जलचरांच्या प्रजातींची संख्या वाढवूनच स्थानिक प्रजातींचा संग्रह वाढवता येऊ शकतो, या विचाराने मा मत्स्यालयाची संकल्पना मांडण्यात आली होती.

त्यानुसार मागवलेल्या निविदेमध्ये एस. के.एस. कारकाला ही कंपनी पात्र ठरली असून विविध करांसह तब्बल ७० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. या कंपनीने कुर्ला नेहरू नगर येथील महापालिका शालेय इमारतीच्या पुनर्बाधणीचे काम केले आहे; परंतु या कंपनीने मत्स्यालय बनवणाऱ्या कंपन्यांशी करार केल्यामुळे निविदा अटींमध्ये ही कंपनी पात्र ठरल्याने याची निवड करण्यात आली आहे. मा मत्स्यालमाच्या बांधकामांमध्ये घुमटाकार मत्स्यालय, पद भ्रमण बोगदा मत्स्यालय, पॉप-अप विंडो आदींची सुविधा असेल. आयताकृती आणि वर्तुळाकार टाक्या बोगद्या मत्स्यालपाव्यतिरिक्त, या मत्स्यालयात अॅक्रिलिक पॅनल्समध्ये बनवलेले ०४ आयताकृती टाक्या, ५ वर्तुळाकार टाक्या आणि ०२ अर्धगोलाकार टाक्या बनवण्यात येणार आहेत.

Comments
Add Comment