पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २५ हिंदू पर्यटक आणि एक स्थानिक अशा २६ जणांना ठार केले. ज्या पहलगामला अनेक पर्यटन कंपन्या मिनी स्विर्त्झलंड म्हणतात त्याच ठिकाणी अतिरेक्यांनी पर्यटकांची हत्या केली. नाव आणि धर्म विचारुन अनेकांना ठार करण्यात आले. ही धक्कादायक घटना मंगळवार २२ एप्रिल २०२५ रोजी घडली.
पाकिस्तानच्या जिहादची नवी पद्धत, भाजपाच्या निशिकांत दुबेंचा आरोप
Another horrific footage of #PahalgamTerroristAttack.
— Bharggav Roy 🇮🇳 (@Bharggavroy) April 28, 2025
पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्याचे व्हिडीओ हळू हळू येऊ लागले आहेत. आता पहलगाम अतिरेकी हल्ल्याचे दोन नवे व्हिडीओ व्हायरल होऊ लागले आहेत. यातील एका व्हिडीओत अतिरेक्यांच्या गोळीबारामुळे पर्यटक जमिनीवर कोसळताना दिसत आहेत. दुसरा व्हिडीओ जेमतेम २९ सेकंदांचा आहे. या व्हिडीओत अतिरेक्यांनी गोळीबार सुरू केल्याचे आवाज ऐकू येतात. अतिरेक्यांनी गोळीबार सुरू करताच घटनास्थळी असलेल्यांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मिळेल त्या मार्गाने पळायला आणि सुरक्षित जागा गाठायला सुरुवात केली. या पळापळीवेळी एका व्यक्तीने मोबाईलमध्ये व्हिडीओ करण्याचा प्रयत्न केला. या व्हिडीओत नागरिकांची पळापळ सुरू असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
LATEST PAHALGAM VIDEO: The segregation on religious lines. The sadism. The scene shows all the things the Congress led ecosystem is denying.
What a shame! What a betrayal of these innocents. What a pathetic attempt to cleanchit this devlishness. pic.twitter.com/NHOvGlR1pF
— Rahul Shivshankar (@RShivshankar) April 28, 2025
लष्कर – ए – तोयबा या पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी संघटनेची शाखा असलेल्या द रेझिस्टन्स फोर्स या संघटनेने पहलगाम हल्ल्याची जबाबदारी घेतल्याचे आधी जाहीर केले. नंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पवित्रा घेतला. भारताने सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगित केल्याचे जाहीर केले. ही घोषणा झाल्यानंतर द रेझिस्टन्स फोर्स या संघटनेने पहलगाम हल्ल्याशी संबंध नाही, असा नवा दावा करण्याचा प्रयत्न केला.