नवी दिल्ली : पाकिस्तानने जिहादची एक नवी पद्धत वापरण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानी महिला भारतात येतात आणि भारतीय व्यक्तीशी निकाह करतात. निकाह केला तरी त्या भारताची नागरिकता स्वीकारत नाहीत. पण इथे मुलांना जन्म देतात आणि अधूनमधून माहेरपणाला जाण्याच्या निमित्ताने पाकिस्तानचा दौरा करुन येतात.
हवाई दलापोठापाठ भारतीय नौदलातही दाखल होणार राफेल विमानांचा ताफा
पाकिस्तानी आतंकवाद का एक नया चेहरा अब सामने आया,लगभग 5 लाख से उपर पाकिस्तानी लड़की भारत में शादी कर हिंदुस्तान में रह रही है,आजतक उनको भारत की नागरिकता नहीं मिली है ।अंदर घुसे इन दुश्मनों से लड़ना कैसे?
— Dr Nishikant Dubey (@nishikant_dubey) April 28, 2025
पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द केले. पाकिस्तानच्या नागरिकांना देश सोडण्याचा आदेश दिला. या निमित्ताने पाकिस्तानी महिलांचा जिहाद उघड झाला.
भारतात किमान पाच लाख पाकिस्तानी महिला निकाह करुन राहत आहेत, असे भाजपाचे लोकसभेतील खासदार निशिकांत दुबे म्हणाले. पाकिस्तानमधून आलेल्या महिलांचा मुद्दाम भारतीयांशी निकाह करण्याचा उद्देश काय आहे, याचा तपास व्हायलाच हवा; अशीही मागणी निशिकांत दुबेंनी केली आहे.
खासदाराने थेट एक्स पोस्ट करुन आरोप केल्यामुळे अनेकांचं लक्ष वेधलं गेलंय. आता या प्रकरणात केंद्र सरकार काय कारवाई करतंय याकडे अनेकांच लक्ष आहे.