Monday, April 28, 2025
Homeताज्या घडामोडीJasprit Bumrah Son : "आमचा मुलगा तुमच्या मनोरंजनाचा विषय नाही", बुमराहच्या पत्नीचा...

Jasprit Bumrah Son : “आमचा मुलगा तुमच्या मनोरंजनाचा विषय नाही”, बुमराहच्या पत्नीचा ट्रोलर्सना चोख दणका!

मुंबई : लखनऊ सुपर जायन्ट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात काल ( दि .२७) पार पडलेल्या सामन्यानंतर जसप्रीत बुमराह आणि संजना यांचा मुलगा अंगदचा एक व्हिडिओ व्हायरलं झाला.या व्हिडीओवरून नेटकऱ्यांनी अंगदला ट्रोल केले. यावरून क्रीडा प्रसारक आणि जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनने तिचा मुलगा अंगदची खिल्ली उडवणाऱ्यांना चोख उत्तर दिले आहे.

NCERT Textbook Update : सातवीच्या एनसीईआरटीच्या पुस्तकातून मुघलांचा इतिहास हद्दपार !

संजनाने समाज माध्यमांवर स्टोरी पोस्ट करत लोकांना काही सेकंदांच्या फुटेजवरून त्यांच्या छोट्या मुलाला ट्रोल करायचे थांबवण्याचे आवाहन केले. ट्रोलर्सना कडक संदेश देत ती म्हणाली, “आमचा मुलगा तुमच्या मनोरंजनासाठी विषय नाही. जसप्रीत आणि मी अंगदला सोशल मीडियापासून दूर ठेवण्यासाठी आमच्या परीने सर्वतोपरी प्रयत्न करतो कारण इंटरनेट हे एक घृणास्पद ठिकाण आहे आणि कॅमेऱ्यांनी भरलेल्या क्रिकेट स्टेडियममध्ये मुलाला आणण्याचे परिणाम मला पूर्णपणे समजतात, पण कृपया हे समजून घ्या की अंगद आणि मी जसप्रीतला पाठिंबा देण्यासाठी तिथे होतो, दुसरे काही नाही,”

 

संजनाने दीड वर्षांच्या अंगदसाठी “नैराश्य” सारखे मानसिक आरोग्याशी संबंधित शब्द वापरणाऱ्या वापरकर्त्यांचा निषेध केला.पुढे ती म्हणाली “मुलाच्या संदर्भात आघात आणि नैराश्य यासारख्या शब्दांचा वापर हा आपण एक समुदाय म्हणून काय बनत आहोत याचे प्रतिबिंब आहे आणि ते खरोखरच खूप दुःखद आहे. तुम्हाला आमच्या मुलाबद्दल, आमच्या आयुष्याबद्दल काहीही माहिती नाही आणि मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही तुमचे ऑनलाइन मत फक्त तेवढ्यापुरते मर्यादित ठेवा.”

नेमकं काय घडलं ?

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर काल ( दि .२७) पार पडलेल्या मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स सामना चांगलाच रंगला. या सामन्यादरम्यान मुंबई इंडियन्सचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज जसप्रीत बुमराहचा मुलगा टीव्ही स्क्रीनवर दिसला. यावेळी छोट्या अंगदने काही प्रतिक्रिया दिली नाही यावरून इंस्टाग्रामवरच्या काही लोकांनी त्याला ट्रोल केले होते.यावर जसप्रीत बुमराहची पत्नी संजनाने ट्रोल करणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -