स्पेन : वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे युरोपमधील काही देशांमध्ये अंधार पसरला आहे. स्पेन, फ्रान्स आणि पोर्तुगाल या तीन देशांना सर्वाधिक फटका बसला आहे. तिन्ही देशांमध्ये रेल्वे, मेट्रो, रस्ते, विमान वाहतूक पुरती कोलमडली आहे. विमानतळांवर तसेच मेट्रो आणि रेल्वेच्या स्थानकांवर गोंधळाची परिस्थिती आहे. वेगवेगळ्या रस्त्यांवर वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. सिग्नल यंत्रणा ठप्प झाली आहे.
इबेरियन द्वीपकल्पात वीजपुरवठा खंडित झाला. यानंतर संपूर्ण पॉवर ग्रिड संकटात सापडली. स्पॅनिश ग्रिड ऑपरेटर रेड इलेक्ट्रिका यांनी प्रादेशिक ऊर्जा कंपन्यांच्या मदतीने वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. युरोपियन ऊर्जा उत्पादक आणि ऑपरेटर्सच्या समन्वयाने, ऊर्जा पुरवठा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे पोर्तुगालच्या आरईएन कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले.
अनेक ठिकाणी लिफ्ट बंद पडल्या. रुग्णालयांमध्ये बिकट परिस्थिती निर्माण झाली. वाहतूक व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बॅटऱ्या (टॉर्च) घेऊन पोलिसांना ठिकठिकाणी बंदोबस्ताला उभे राहावे लागले.
जयपूर: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४७व्या सामन्यात आज राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सवर ८ विकेट राखत…
मच्छिमारांच्या घरांसाठी केंद्राने भूमिका घ्यावी - मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मत्स्योत्पादनाचा…
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा मोलाचा सल्ला मुंबई : सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे,…
पुणे : हवाई प्रवास करताना योग्य दरात आणि गुणवत्तापूर्ण अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने पुणे…
फ्रांन्सशी झाला ६४ हजार कोटी रुपयांचा करार नवी दिल्ली: भारत सरकार नौदलासाठी 26 राफेल मरीन…
नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर भारत- पाकिस्तानात तणावपूर्ण वातावरण आहे. हे संबंध आणिखी ताणले जाऊ…