नवी दिल्ली: भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या शिफारशीनुसार, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर काही पाकिस्तानी यूट्यूब चॅनेल्सवर बंदी (Pakistani YouTube Channel Banned) घालण्यात आली आहे.
भारतीय सैन्य आणि सुरक्षा एजन्सींविरुद्ध भडकाऊ, खोटी, दिशाभूल करणारी विधाने आणि चुकीची माहिती पसरू नये म्हणून सरकारने हा कठोर निर्णय घेतला आहे.
अनेक मोठ्या पाकिस्तानी युट्यूब चॅनेलवर बंदी
पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकार पाकिस्तान विरुद्ध सतत कठोर कारवाई करत आहे. आता मोदी सरकारने आणखी एक कठोर निर्णय घेतला आहे. तो म्हणजे केंद्राने पाकिस्तानातील अनेक मोठ्या यूट्यूब चॅनेलवर बंदी घातली आहे.
या युट्युब चॅनल्सचा समावेश
बंदी घालण्यात आलेल्या यूट्यूब चॅनेल्समध्ये शोएब अख्तर, आर्जू काझमी आणि सय्यद मुजम्मिल शाह या प्रसिद्ध लोकांच्या चॅनेल्सचादेखील समावेश आहे. तसेचज डॉन न्यूज, समा टीव्ही, जिओ न्यूजसह १६ पाकिस्तानी युट्यूब चॅनेलवर बंदी घालण्यात आली आहे. यांवर भारत, भारतीय लष्कर आणि सुरक्षादलांविरोधात खोटी, दिशाभूल करणारी माहिती आणि धार्मिक तेढ निर्माण करणारी सामग्री पसरवल्याचा आरोप आहे.