Monday, April 28, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMumbai-Goa highway : कशेडी घाटातील जुन्या राष्ट्रीय महामार्गावर भेगा; तर मुंबई गोवा...

Mumbai-Goa highway : कशेडी घाटातील जुन्या राष्ट्रीय महामार्गावर भेगा; तर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर भुयारी मार्गात दरडी कोसळण्याचा धोका

पोलादपूर (शैलेश पालकर) : कशेडी घाटातील जुन्या मुंबई गोवा महामार्गावर (Mumbai-Goa highway) भोगाव हद्दीत भेगा पडल्याने कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गात येत्या पावसाळ्यात दरडी कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय म्हणून भुयारी मार्गे चौपदरीकरणाचे काम करण्यात आले आहे. येथील भोगाव गावाच्या हद्दीत डोंगरांचे उत्खनन करून डोंगर कापण्यात आला असून नवीन महामार्ग भुयारी मार्गे वळवण्यात आला आहे. या ठिकाणी भोगावच्या हद्दीत घाटरस्त्याला पाच ते दहा मीटर अंतरावर मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत. येत्या पावसाळ्यात येथील रस्ता खचल्यास भुयाराकडे जाणाऱ्या नवीन महामार्गावर दरड कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Suraj Chavan: ‘या’ दिवशी पाहता येणार,फक्त ९९ रुपयांत; सूरज चव्हाणचा ‘झापुक झुपूक’

कशेडी घाटरस्त्यावर भेगा पडल्याने भुस्खलन होऊन नवीन महामार्गावर दरड कोसळण्याची शक्यता लक्षात घेता महामार्ग प्रशासनाकडून तात्काळ उपाय योजना करण्याची आवश्यकता आहे. सद्यस्थितीत कशेडी घाटातील वाहतूक भुयारी मार्गे होत असल्याने जुन्या महामार्गावर तुरळक वाहतूक सुरू आहे.

भुयारी मार्गाकडे जाणाऱ्या नवीन मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर दरडी कोसळून महामार्गावरील वाहतूक जुना घाटरस्ता खचल्याने धोकादायक आणि नवीन पर्यायी भुयारी मार्गात दरडी कोसळण्याच्या शक्यतेने धोकादायक अशी परिस्थिती उदभवणार आहे.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील कशेडी घाटरस्ता भेगा पडल्याने पर्यायी भुयारी मार्गापर्यंत जोडणाऱ्या नवीन रस्त्यावर घाटरस्ता कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भेगा पडलेल्या भागातील घाटरस्त्यावरून वाहतूक टाळण्यासाठी केलेल्या बंदोबस्ताचे दृश्य (छाया-शैलेश पालकर)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -