Monday, April 28, 2025
Homeताज्या घडामोडी"तुमच्या नेत्यांना आवरा!" काँग्रेसच्या वाचाळवीरांविरुद्ध भाजपचा हल्लाबोल, पहलगाम हल्ल्यांविरुद्ध वक्तव्यावर संताप

“तुमच्या नेत्यांना आवरा!” काँग्रेसच्या वाचाळवीरांविरुद्ध भाजपचा हल्लाबोल, पहलगाम हल्ल्यांविरुद्ध वक्तव्यावर संताप

पहलगाम हल्ल्यावरील काँग्रेसच्या वादग्रस्त वक्तव्यावरून भाजपने साधला निशाणा 

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) देशभरात त्याविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे.या हल्ल्यानंतर देशात पाकिस्तानविरुद्ध कारवाईची मागणी होत आहे. देशातील सर्व राजकीय पक्षांनी देखील या हल्ल्याचा निषेध केला आहे. मात्र, काँग्रेसच्या काही नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून, भाजपने विरोधकांवर निशाणा साधला आहे. (BJP targets Congress over controversial statement on Pahalgam attack)

पहलगाम हल्ल्यानंतर देशात पाकिस्तानविरुद्ध कारवाईची मागणी होत आहे. मात्र या दरम्यान, काँग्रेसच्या काही वाचाळवीरांनी केलेल्या वक्तव्यावरून भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांना “तुमच्या नेत्यांना आवरा’ असा हल्लाबोल केला आहे. सोमवारी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

‘राहुल गांधीचे त्यांच्या नेत्यांवर नियंत्रण नाही का?”

माध्यमाशी संवाद साधताना रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर निशाणा साधला. काँग्रेसची राष्ट्रीय एकतेची हाक दिली, ती फक्त औपचारिकता होती का? असा प्रश्न त्यांनी विचारला. खरं तर, त्यांनी ही टिप्पणी कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता, ज्यामध्ये बहुतेक पर्यटक होते, या टिप्पणीनंतर केली आहे. याबद्दल, रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेस वरिष्ठांना विचारले की, “राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांचे पक्षावर नियंत्रण नाही का? किंवा दोघांनीही औपचारिक भाषणे केली आणि इतरांना त्यांच्या इच्छेनुसार बोलण्याची परवानगी दिली?”

वडेट्टीवार, तिम्मापूर आणि राहुल गांधीचे मेहुणे रॉबर्ट वढेरा यांचीही नावे

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावरील वादग्रस्त वक्तव्याबद्दल सिद्धरामय्या यांच्याव्यतिरिक्त, महाराष्ट्राचे नेते विजय वडेट्टीवार, कर्नाटकचे मंत्री आरबी तिम्मापूर आणि राहुल गांधी यांचे मेहुणे रॉबर्ट वढेरा यांचीही नावे घेण्यात आली. आणि तिम्मापूर सारख्या लोकांनी काही पीडितांच्या विधानांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या झाडल्या नाहीत असे वक्तव्य त्यांनी केले आहे. ज्यामुळे भाजपकडून त्यांच्यावर निशाणा साधला जात आहे.

‘संपूर्ण जग भारतासोबत उभे आहे’

भाजप नेत्याने म्हटले की, दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण जग भारतासोबत आहे, मग ते अमेरिका असो, फ्रान्स असो किंवा सौदी अरेबिया असो, तरी हे नेते अशाप्रकारे बेजबाबदार भाष्य करत आहेत. ते म्हणाले की ही असंवेदनशीलतेची परिसीमा आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -