मुंबई : सध्याचं जग हे महिला सबलीकरणाचं जग आहे. एकेकाळी फक्त पुरुषांसाठी असलेले अनेक मार्ग महिलांसाठी खुले झाले आहेत. त्यामुळे आता जवळपास प्रत्येक क्षेत्रात महिलाराज पाहायला मिळतं. आणि आता ओटीटी प्लॅटफॉर्म्स सुद्धा त्याला अपवाद नाहीत. कारण, लवकरच लाँच होतोय महिलांसाठीचा ओटीटी प्लॅटफॉर्म..
प्लॅनेट मराठीचे संस्थापक अक्षय बर्दापूरकर यांनी प्लॅनेट स्त्री या भारतातल्या पहिल्या महिलांसाठीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मची घोषणा केली आहे. हे अॅप १ मे २०२५ला महाराष्ट्र दिनी अधिकृतपणे लाँच केलं जाणार आहे. विविध क्षेत्रातल्या सात कर्तृत्ववान महिलांच्या हस्ते हे अॅप लाँच केलं जाईल.
या प्लॅटफॉर्मवर महिलांच्या जीवनावर केंद्रित असलेल्या पॉडकास्ट मालिका, वेब फिल्म्स आणि लघुपट पाहता येतील. त्याखेरीज महिलांसाठी डॉक्टर, ज्योतिष तसंच रेसिपी अशा विविध विषयांवर व्हिडीओ पाहता येतील. हळूहळू याचा विस्तार करून ऑनलाईन गेमिंग आणि शॉपिंगही करता येणार आहे.