Saturday, October 25, 2025
Happy Diwali

वासुदेव आला - कविता आणि काव्यकोडी

वासुदेव आला - कविता आणि काव्यकोडी
हातात चिपळ्या गळ्यात माळा मोरपिसांची टोपी गाता गळा घोळदार झगा काखेत झोळी खांद्यावर शेला टिळा कपाळी पावा वाजवीत अंगणात येई देवाची गाणी सुरात गाई सुपातील धान्य झोळीत घेई ‘दान पावलं...’ आरोळी देई मुलांचा घोळका जमतो भोवती आनंदाला मग येतेच भरती सकाळच्या पारी हरीनाम बोला गाव जागं करायला वासुदेव आला हो वासुदेव आला...

काव्यकोडी - एकनाथ आव्हाड

१)किलबिल याच्या पडती कानी यालाच सुचतात फुलांची गाणी फांद्या याच्या हलती छान हसते कोणाचे पान न् पान ? २) येथे भेटते मित्रमंडळ गुरुजी, बाई खूप प्रेमळ वह्या, पुस्तके आणखी अभ्यास कोठे होतो आपण पास? ३) गाय, वासरू मांजर, मोती मला पाहताच हरखून जाती त्यांच्याशी आहे माझी दोस्ती कोण बरं हे माझे सोबती?

उत्तर -

१) झाड २) शाळा ३) पाळीव प्राणी
Comments
Add Comment