Sunday, April 27, 2025
Homeताज्या घडामोडीJammu Kashmir Trekking : जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगला स्थगिती!

Jammu Kashmir Trekking : जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगला स्थगिती!

पर्यटकांना खोऱ्यात प्रवेश करण्यास बंदी

नवी दिल्ली : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) जम्मू आणि काश्मीरमधील ट्रेकिंग (Jammu Kashmir Trekking) मोहिमांना पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आले आहेत. स्थानिक अधिकाऱ्यांनी पहलगामच्या वरच्या भागात, चंदनवारी, अरू, बेताब व्हॅली आणि बैसरन व्हॅलीसह पर्यटक आणि ट्रेकर्स मोहीम आधीच थांबवली आहे. पहलगामच्या सर्व वरच्या भागात कोणत्याही प्रकारच्या पर्यटन मोहिमा, ट्रेकिंगवर सध्या पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Food Poisoning : लग्न समारंभाला जाताय सावधान! जेवणातून ६०० जणांना विषबाधा; एकाचा मृत्यू

दरवर्षी हजारो लोक जम्मू आणि काश्मीरमध्ये ट्रेकिंगसाठी येतात. यामुळे या भागात पर्यटकांची मोठी वर्दळ होती. उन्हाळ्याच्या काळात गर्दी वाढते, कारण त्यावेळी बर्फ वितळतो आणि ट्रेकिंगचे मार्ग खुले होतात. आता अचानक आलेली ही बंदी केवळ ट्रेकिंग प्रेमींसाठी धक्का नाही, तर स्थानिक पर्यटन उद्योगासाठी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण करत आहे.
स्थानिक मार्गदर्शक, पोर्टर, होमस्टे मालक आणि दुकानदार जे प्रामुख्याने ट्रेकिंग हंगामावर अवलंबून असतात, त्यांनाही या निर्णयाचा आर्थिक फटका बसू शकतो.

ट्रेकिंग शौकिनांचाच हिरमोड

उन्हाळ्यात बर्फ वितळल्यानंतर हजारो पर्यटक काश्मीरमध्ये ट्रेकिंगसाठी येतात. मात्र पहलगाम येते झालेल्या हल्ल्यामुळे प्रशासनाने हा निर्णय हाती घेतला आहे. जम्मू-काश्मीर पोलीस, सीआरपीएफ आणि लष्कराने संयुक्तपणे सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली असून, उंचावरील भागात गस्त वाढवली आहे व ड्रोनद्वारे नजर ठेवली जात आहे. पर्यटकांना केवळ अधिकृत आणि सुरक्षित ठिकाणीच जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सर्व ट्रेकिंग परवाने निलंबित केले असून, आधी दिलेले परवानेही रद्द केले आहेत. दरम्यान, या अचानक आलेल्या बंदीमुळे केवळ ट्रेकिंग शौकिनांचाच हिरमोड झाला नाही, तर स्थानिक अर्थव्यवस्थेवरही गंभीर परिणाम होणार आहे. मार्गदर्शक (गाईड), पोर्टर, होमस्टे चालक आणि दुकानदार, ज्यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर ट्रेकिंग हंगामावर अवलंबून असते, त्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागेल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -