Monday, April 28, 2025
Homeक्राईमJalgaon Crime : सैराटची पुनरावृत्ती! प्रेम विवाह केल्याच्या रागात जन्मदाता उठला मुलगी...

Jalgaon Crime : सैराटची पुनरावृत्ती! प्रेम विवाह केल्याच्या रागात जन्मदाता उठला मुलगी अन् जावयाचा जीवावर

जळगाव : सैराट चित्रपटात (Sairat Movie) जसा पळून जाऊन प्रेमविवाह केलेल्या तरुणांवर प्राणघातक हल्ला होतो, तशीच घटना जळगावमध्ये (Jalgaon Crime) घडल्याचे समोर आले आहे. मुलीने प्रेमविवाह केल्याच्या रागात जन्मदाता मुलगी आणि जावयाच्या जीवावर उठला. प्रेमविवाहच्या रागात आरोपी जन्मदात्याने बंदूकीने गोळ्या झाडून मुलीची हत्या केली असून जावयाला गंभीर जखमी केले आहे. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

Jammu Kashmir Trekking : जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगला स्थगिती!

मिळालेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी तृप्ती (२४) आणि अविनाश यांनी प्रेमविवाह केला होता. हा विवाह तृप्तीचे वडील किरण मंगले यांना मान्य नव्हता. परंतु मुलीने प्रेम विवाह केल्याचा राग आरोपी बापाच्या मनात होता. दरम्यान, अविनाशच्या बहिणीच्या हळदी समारंभात या दोघांनी हजेरी लावली असून आरोपी किरण मंगले हे देखील आले होते. त्यावेळी आरोपीला त्याची मुलगी आणि जावई दिसताच रागाच्या भरात त्यांच्या गोळ्या झाडल्या. या घटनेमध्ये मुलीचा जागीच मृत्यू झाला असून तिच्या पतीच्या पाठीत गोळी घुसल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.

मृत तरुणी तृप्तीचे वडील किरण अर्जुन मंगले हे सीआरपीएफचे निवृत्त अधिकारी आहेत. त्यांनी त्यांच्या परवाना असलेल्या बंदुकीचा वापर करुन हा गोळीबार केला. या घटनेनंतर हळदी समारंभातील इतर वऱ्हाड्यांनी आरोपीला बेदम मारहाण केली असून त्याच्या विरोधात चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. तसेच आरोपी देखील या मारहाणीत जखमी झाल्यामुळे त्याला जळगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या पोलिसांनी आरोपी किरण यांनी या गुन्ह्यात वापरलेली पिस्तूल जप्त केली आहे, अशी माहिती जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली.

पुण्यात बहिणीच्या नवऱ्यावर कोयत्याने हल्ला

पुणे शहरात देखील सैराट चित्रपटाची पुनरावृत्ती झाल्याची घटना घडली. बहिणीशी पळून जाऊन लग्न केल्याचा राग मनात धरून तिघांनी एका युवकावर कोयता आणि लोखंडी रॉडने हल्ला करत त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. ५ एप्रिल रोजी सांगवी गावच्या हद्दीत वडगाव मावळ सांगवी रस्त्यालगत असलेल्या अनुष्का हॉटेलजवळ घडली.

संकेत तोडकर असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून शिवराज बंडू जाधव, यश अजय जाधव, आणि विशाल पाथरवट असे आरोपींचे नावे आहे. या प्रकरणातील दोन आरोपी यश जाधव आणि विशाल पाथरवट यांना वडगाव पोलिसांनी मोठ्या कसरतीने अटक केली आहे. वडगाव मावळ न्यायालयाने या दोघांना आठ दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. तर शिवराज जाधव अद्यापही फरार आहे या प्रकरणाचा अधिकचा तपास मावळ पोलीस करत आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -