Sunday, April 27, 2025
Homeताज्या घडामोडीMohan Bhagwat: "आम्ही शेजाऱ्यांना इजा करत नाही, पण जर ते वाईट मार्गाकडे...

Mohan Bhagwat: “आम्ही शेजाऱ्यांना इजा करत नाही, पण जर ते वाईट मार्गाकडे वळले तर…” जम्मू-काश्मीर हल्ल्यानंतर मोहन भागवत यांचं मोठं वक्तव्य

मुंबई: अहिंसा हा भारताचा धर्म आहे, हिंदू धर्माचे ते मुख्य तत्व आहे, यावर भर देत संघ प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी “भारत कधीही आपल्या शेजाऱ्यांचा अपमान करत नाही किंवा इजा करत नाही, परंतु जर वाईट कृत्य वाढले तर बचावात प्रत्युत्तर देण्याशिवाय पर्याय नाही. असे जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये (Pahalgam Terror Attack) झालेल्या घातक दहशतवादी हल्ल्यासंदर्भात शनिवारी वक्तव्य केले. या भ्याड हल्ल्यात २६ पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यासंदर्भात प्रत्येक स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. संघ प्रमुख मोहन भागवत यांनी देखील या हल्ल्याविरुद्ध जोरदार निषेध व्यक्त केला आहे. दरम्यान शनिवारी झालेल्या द हिंदू मेनिफेस्टो नामक पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात त्यांनी जनतेला संबोधित करताना हे वक्तव्य केले.

काय म्हंटले मोहन भागवत?

अहिंसा हे हिंदू धर्माचे मुख्य तत्व आहे, मात्र आक्रमकांना तोंड देणे आणि विजय मिळवणे हा देखील धर्माचा एक भाग आहे.  रावणाचा वध त्याचा नायनाट करण्यासाठी नाही तर त्याच्या भल्यासाठी केला गेला होता, असं उदाहरण त्यांनी यावेळी दिलं.

“आपण कधीही आपल्या शेजाऱ्यांचा अपमान करत नाही किंवा त्यांना इजा पोहोचवत नाही. पण जर कोणी वाईटाकडे वळले तर दुसरा पर्याय काय आहे? प्रजेचे रक्षण करणे हे राजाचे कर्तव्य आहे, आणि त्याने त्याचे कर्तव्य बजावले पाहिजे,” असं देखील भागवत पुढे म्हणाले.

भागवत यांनी आपल्या भाषणात चार तत्वांवर भर दिला आहे, ते म्हणाले “सनातन धर्माची खरी समज सध्याच्या काळात महत्त्वाची आहे. हिंदू धर्म सत्य, सुचितता, करुणा आणि तपस्या या चार स्तंभांवर उभा राहिला पाहिजे. याच्या पलीकडे जाणारी प्रत्येक गोष्ट अधर्म आहे,”

हिंदू शांत बसणाऱ्यातले नाही

दुसऱ्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी नमूद केले की हल्लेखोरांनी लोकांना धर्म विचारून गोळ्या घातल्या. हिंदू असे कधीच करणार नाहीत. हे आपले स्वरूप नाही. द्वेष आणि शत्रुत्व आपल्या संस्कृतीचा भाग नाही. पण शांतपणे हानी सहन करणेही आपला स्वभाव नाही.

पाकिस्तान समर्थित दहशतवादी गट द रेझिस्टन्स फ्रंटने या दहशतवादी हल्ल्याचा दावा केला आहे आणि अलिकडच्या काळातल्या सर्वात प्राणघातक घटनांपैकी एक म्हणून या हल्ल्याचे वर्णन केले जात आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -