अंत्यसंस्काराला अडीच लाख लोकांची उपस्थिती
नवी दिल्ली : ख्रिश्चन कॅथोलिक धार्मिक नेते पोप फ्रान्सिस यांचे पार्थिव रोममधील सांता मारिया मॅगिओर बॅसिलिका येथे दफन करण्यात आले आहे. मृतदेह दफन करण्यापूर्वी येथे एक छोटी प्रार्थना करण्यात आली. पोपच्या अंत्यसंस्कार समारंभाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले नाही. हे ठिकाण सेंट पीटर्स स्क्वेअरपासून ४ किमी अंतरावर आहे. पोप फ्रान्सिसची शेवटची इच्छा होती की त्यांना जमिनीत एका साध्या कबरीत पुरले जावे, ज्यावर फक्त फ्रान्सिसस (त्यांच्या फ्रान्सिस नावाचे लॅटिन रूप) हे नाव असावे.
Nitesh Rane : हिंदू म्हणून एकत्र या, हे सरकार तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे
सेंट पीटर्स स्क्वेअर येथे पोपच्या अंत्यसंस्काराचे विधी दुपारी १:३० वाजता सुरू झाले व ३ तास चालले. त्यांचे पार्थिव सेंट पीटर बॅसिलिकामधून काढण्यात आले आणि सेंट पीटर स्क्वेअरमध्ये ठेवण्यात आले, जिथे प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती. पोपच्या अंत्यसंस्कारात अडीच लाख लोक जमले होते. पोपचे अंतिम दर्शन घेण्यासाठी १७० देशांचे प्रतिनिधी आले. यामध्ये भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, अर्जेंटिनाचे अध्यक्ष जेवियर मिले, ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टार्मर व फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा समावेश आहे.