Monday, April 28, 2025
Homeताज्या घडामोडीMann Ki Baat: दहशतवाद विरुद्धच्या लढाईत एकजूट होण्याचा पंतप्रधानांनी दिला संदेश

Mann Ki Baat: दहशतवाद विरुद्धच्या लढाईत एकजूट होण्याचा पंतप्रधानांनी दिला संदेश

नवी दिल्ली: पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथील दहशतवादी हल्ल्याचा सर्वच स्तरातून निषेध होत आहे. या हल्ल्यामध्ये २५ पर्यटक आणि एका काश्मिरी तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला, ज्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळत आहे. त्यामुळे या काळात देशाला एकजूट राहण्याचे आवाहन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (Mann Ki Baat) यामधून केले.

‘मन की बात’ या मासिक रेडिओ कार्यक्रमात देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम हल्ल्याबद्दल वक्तव्य केलं. ते म्हणाले की पहलगाम हल्ला दहशतवाद्यांच्या प्रमुखांचा कमकुवतपणा आणि भ्याडपणा दर्शवितो. “काश्मीरमध्ये शांतता परत येत होती. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये चैतन्य होते, काश्मीरच्या विकास कामांमध्ये अभूतपूर्व गती निर्माण झाली होती, यामुळे लोकशाही मजबूत होत होती, पर्यटकांच्या संख्येत विक्रमी वाढ होत होती, त्यामुळे उत्पन्न वाढत होते आणि तरुणांसाठी नवीन संधी निर्माण होत होत्या. देशाच्या शत्रूंना हे आवडले नाही,” असे ते म्हणाले.

“काश्मीर नष्ट करू इच्छिणाऱ्यांचा खात्मा करू”

पंतप्रधान म्हणाले की, संपूर्ण जग भारतासोबत आहे. “मी शोकाकुल कुटुंबांना खात्री देतो की त्यांना न्याय मिळेल. दहशतवाद्यांनी आणि त्यांच्या प्रमुखांनी हे कट रचले कारण ते काश्मीर नष्ट करू इच्छितात, पण असे कधीच होणार नाही, कारण या हल्ल्यामागील प्रत्येक व्यक्तीला कठोरातली कठोर शिक्षा होईल. ” असेआश्वासन त्यांनी दिले.

“दहशतवादाविरुद्धच्या युद्धात भारतीयांची एकता महत्वाची”

जनतेला संबोधित करताना पंतप्रधान यांनी सामान्य जनतेला एकजूट होण्याचा सल्ला देतात. ” दहशतवादाविरुद्धच्या या युद्धात १४० कोटी भारतीयांची एकता ही सर्वात मोठी ताकद आहे. ही एकता दहशतवादाविरुद्धच्या आपल्या निर्णायक युद्धाचा आधार आहे. या आव्हानाला तोंड देण्यासाठी आपल्याला आपले आदर्श बळकट करावे लागतील. एक राष्ट्र म्हणून आपल्याला आपली इच्छाशक्ती दाखवावी लागेल.” असा संदेश त्यांनी दिला

काश्मीर खोऱ्यातील आतापर्यंतचा सर्वात भयानक दहशतवादी हल्ला

२२ एप्रिल रोजी पहलगाममधील बैसरन येथे झालेला हा दहशतवादी हल्ला काश्मीर खोऱ्यातील आतापर्यंतच्या सर्वात भयानक दहशतवादी हल्ल्यांपैकी एक मानला जात आहे.

यापूर्वी, बिहार येथील सभेत मोदी यांनी या हल्ल्याचा निषेध केला होता. “ज्या दहशतवाद्यांनी आणि ज्यांनी हा हल्ला केला त्यांना अशी शिक्षा मिळेल ज्याची ते कल्पनाही करू शकत नाहीत”. दहशतवाद्यांच्या आश्रयस्थानातून जे काही उरले आहे ते उद्ध्वस्त करण्याची वेळ आली आहे. १४० कोटींची इच्छाशक्ती दहशतवादाच्या मालकांचे कंबरडे मोडेल,” असे म्हणत त्यांनी दहशतवादी समर्थक पाकिस्तानला इशारा दिला आहे.

हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध अनेक राजनैतिक पावले उचलली आहेत. सिंधू पाणी करार स्थगित करण्यात आला आहे आणि भारताने पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा सेवा देखील रद्द करून, भारतात राहत असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना ताबडतोब देश सोडण्याचा निर्देश दिला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -