Sunday, April 27, 2025
Homeताज्या घडामोडीलवकरच येत आहे प्लानेट स्त्री, महिलांसाठी स्वतंत्र ओटीटी

लवकरच येत आहे प्लानेट स्त्री, महिलांसाठी स्वतंत्र ओटीटी

मुंबई : ‘प्लानेट मराठी’चे संस्थापक अक्षय बर्दापूरकर १ मे २०२५ रोजी महाराष्ट्र दिनी ‘प्लानेट स्त्री’ हा महिलांसाठी स्वतंत्र ओटीटी प्लॅटफॉर्म सुरू करत आहेत. या प्लॅटफॉर्मवर फक्त महिलांसाठी म्हणून विशेष कंटेंट असेल. महिलांनी, महिलांनी आणि महिलांसाठी तयार केलेला ओटीटी प्लॅटफॉर्म असे ‘प्लानेट स्त्री’चे स्वरुप असेल. प्रतिष्ठीत महिलांच्या उपस्थितीत या ओटीटी प्लॅटफॉर्मचे लाँचिंग होणार आहे.

Kartik Aaryan Naagzilla Movie : फन फैलाने आ रहा हू… कार्तिक आर्यनचा नागराज अवतार!

महिलांनी महिलांसाठी तयार केलेले पॉडकास्ट, महिलांसाठी वेबफिल्म, महिलांच्या जीवनावर केंद्रीत लघुपट आणि माहितीपट, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ महिलांकडून संबंधित क्षेत्राविषयी मार्गदर्शन किंवा टिप्स देणारे अनेक व्हिडीओ पण या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असतील. ग्रामीण महिला आणि महिला शेतकऱ्यांच्या योगदानावर प्रकाश टाकणारे तसेच महिला उद्योजिकांविषयीचे व्हिडीओ पण या प्लॅटफॉर्मवर बघता येतील. ज्ञात आणि अज्ञात अशा अनेक महिला कलाकारांना या मंचाद्वारे एकत्र आणण्याचा प्रयत्न केल जाईल. लवकरच हा ओटीटी प्लॅटफॉर्म अनेक भारतीय भाषांमध्ये उपलब्ध होणार आहे. ‘प्लानेट स्त्री’ लोकप्रिय झाल्यास भविष्यात या प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन गेमिंग आणि ऑनलाईन शॉपिंग हे पर्याय उपलब्ध होणार आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -