Sunday, April 27, 2025
Homeदेशपहलगाम हल्ल्याचा तपास करणार NIA, गृह मंत्रालयाने दिली जबाबदारी

पहलगाम हल्ल्याचा तपास करणार NIA, गृह मंत्रालयाने दिली जबाबदारी

नवी दिल्ली: केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास राष्ट्रीस तपास यंत्रणेकडे सोपवला आहे. गृहमंत्रालयाने याबाबत अधिकृतरित्या नोटिफिकेशन जारी केले आहे. आता एनआयए औपचारिकरित्या या बाबत केस दाखल करून विस्तृत तपास करेल.

सूत्रांच्या माहितीनुसार, एनआयएची टीम आधीपासूनच पहलगाम येथे उपस्थित होती. त्यांनी हल्ल्यानंतर घटनास्थळाचे निरीक्षण केले आहे. एजन्सीची फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पुरावे शोधत आहे. तपास यंत्रणा स्थानिक पोलिसांकडून यासंबंधीची केस डायरी, एफआयआर आणि इतर महत्त्वाचे कागदपक्ष आपल्या ताब्यात घेईल.

मिळालेल्या माहितीनुसार, एनआयएची टीम पहलगाम हल्ल्यातील पीडितांची भेट घेऊन पुरावे मिळवण्याच्या तयारीत आहे. एनआयएची विशेष टीमने दहशतवादी हल्ल्यात जिवंत बचावलेल्या पर्यटकांसह प्रत्यक्षदर्शींसोबतही संपर्क कऱण्यास सुरूवात केली आहे.

पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ लोकांचा जीव गेला होता. यातील सुरूवातीच्या तपासावरून मिळालेल्या माहितीनुसार यात सामील असलेल्या दहशतवाद्यांची संख्या पाच ते सात असू शकते. अधिकाऱ्यांनी सांगितले की त्यांना पाकिस्तानात प्रशिक्षण प्राप्त कमीत कमी दोन स्थानिक दहशतवाद्यांची मदत मिळाली होती.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -