प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आराखडा तयार
मुंबई (प्रतिनिधी): मुंबई महानगरपालिकेने पावसाळी आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या प्रभावी अमलबजावणीसाठी प्रशासकीय विभागनिहाय आराखडा तयार केला आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाली कृती पथक नेमण्यात येणार असून, प्रशासकीय विभागातील सहायक आयुक्त, वैद्यकीय अधिकारी, कोटक निमंत्रण अधिकारी यांच्या समन्वयातून ही प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंबई महानगरपालिकेकडून प्रशासकीय विभागनिहाय आराखडा तयार करण्पात आला आहे. या आराखड्यानुसार प्रशासकीय विभागातील सहायक आयुक्त, वैद्यकीय अधिकारी, कीटक नियंत्रण अधिकारी यांच्या समन्चषातून कार्यवाही करण्पात येणार आहे. तसेच सार्वननिक आरोग्य यंत्रणेतील कर्मचारी, खासगी दवाखाने डॉक्टर, तसेच बांधकामाच्या ठिकाणी असलेल्या सुरक्षा अधिकारी व कामगार यांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासोबतच खासगी रुग्णालये, दवाखाने यांच्या सहभागातून रुग्णांचा शोध घेणे, आजाराचे निदान करण्यापासून संपूर्ण उपचार देऊन रुग्ण बरा करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे, पावसाळी आजारांना प्रतिबंध करण्यासाठी विभागनिहाय शीघ्र प्रतिसाद कृती पथकही नेमण्यात येणार आहेत. ही पथके विविध ठिकाणी भेटी दंगार आहेत.
मुंबई महानगरपालिकेकडून राबविण्यात येणाऱ्या मा प्रतिबंधात्मक उपाययोजनांना शहरातील सर्व यंत्रणांनी सहकार्य करावे, तसेच या मोहिमेमध्ये सक्रियपणे सहभागी व्हावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अणि प्रशासक भूषण गगराणी यांनी केले. डासांची उत्पत्ती स्थाने नष्ट करणे, तसेव महानगरपालिकेचे सर्व दवाखाने, रुग्णालयांमध्ये तापाच्या रुग्णांसाठी ग्रावश्यक निदान व उपचार सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तापाची लक्षणे आढळल्यास नागरिकांनी त्वरित उपचार व वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. डास उत्पत्ती स्थानांच्या ठिकाणी प्रतिबंधात्पक उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने विविध मंत्रणांसोबत उत्तम समन्वय आणि संवादासाठी व्हॉट्स अॅप ग्रुप तपार करण्याचे निर्देश भूषण गगराणी यांनी डास निर्मूलन समितीच्या आढावा बैठकीत दिले.
तसेच मुंबई महानगरपालिकेचा कोटकनाशक विभाग जाणि विविध यंत्रणांच्या सहकार्याने मे महिन्यातील दुसऱ्या आतवतयामध्ये संयुक्त पाहणी दौरा आयोनित करण्याची सूचना त्यांनी केली. या बैठकीस केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग, महाहा, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई पोर्ट ट्रस्ट, नौदल, वायूदल, अभियांत्रिकी सेवा, बेस्ट, टपाल विभाग, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि., भाभा अनुसंशोधन केंद्र, दुग्य विभाग अशा शासकीय, निग शासकीय पंत्रणांच्या अधिकाऱ्यांबरोबरच मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.