नागपूर : महाराष्ट्रातील वाघांच्या संख्येत वाढ होत असताना वाघांच्या मृत्यूमध्येही वाढ झाली आहे. महाराष्ट्र वाघांसाठी ‘यमलोक’ झाल्याची चर्चा यामुळेच सुरू झाली आहे. भारतात मागील चार महिन्यांत ६२ वाघांचा मृत्यू झाला. यापैकी २० वाघांचा मृत्यू एकट्या महाराष्ट्रात झाला आहे. वाघांच्या मृत्यूच्या बाबतीत महाराष्ट्र सध्या देशात पहिल्या स्थानावर आहे. मागील चार महिन्यांत मध्य प्रदेशात १७ वाघांचा मृत्यू झाला आहे. यामुळे वाघांच्या मृत्यूच्या बाबतीत मध्य प्रदेश हा महाराष्ट्राच्या खालोलाख दुसऱ्या स्थानावर आहे.
दहशतवादाला कुठेही स्थान नाही, इराणच्या राष्ट्रपतींनी पंतप्रधान मोदींना केला फोन
भारतात २०२२ मध्ये वाघांची मोजणी अर्थात व्याघ्रगणना झाली. या व्याघ्रगणनेनुसार भारतात तीन हजार १६७ वाघांची नोंद झाली. राज्यात २०१८ मध्ये ३१२ वाघांची नोंद झाली होती. यानंतर २०२२ च्या व्याघ्रगणनेत महाराष्ट्रात ४४४ वाघांची नोंद झाली. व्याघ्र संवर्धनात आघाडी घेतलेल्या महाराष्ट्रात व्याघ्र मृत्यूची संख्याही वाढली आहे.
पहलगाम हल्ल्याचा तपास करणार NIA, गृह मंत्रालयाने दिली जबाबदारी
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात जानेवारी २०२५ पासून २६ एप्रिलपर्यंतच्या चार महिन्यांत ६२ व्याघ्रमृत्यू झालेले आहेत. यापैकी महाराष्ट्रात २० आणि मध्य प्रदेशात १७ व्याघ्रमृत्यू झाले आहेत. हे मृत्यू प्रामुख्याने वन्यजीवांच्या झुंजीत, अपघातात, शिकार अथवा नैसर्गिक कारणामुळे झाले आहेत.
महाराष्ट्रात मागील पाच वर्षात ४१ वाघ आणि ५५ बिबट्यांची शिकार झाली आहे. ही आकडेवारी जानेवारी २०२५ पर्यंतची आहे. मागील पाच पाच वर्षात शिकाऱ्यांनी देशभरात बेकायदेशिररित्या १०० पेक्षा जास्त वाघांची शिकार केली आहे. यातील काही प्रकरणांचा तपास सुरू आहे तर काही प्रकरणांमध्ये कायदेशीर कारवाई सुरू आहे. आता ऑक्टोबर २०२५ मध्ये नव्या व्याघ्रगणनेची सुरुवात होण्याची शक्यता आहे. अद्याप याबाबत घोषणा झालेली नाही. पण तयारी सुरू असल्याचे वृत्त आहे.