मुंबई : आपल्याला कधीकधी कामानिमित्त किंवा फिरायला जाताना विमान प्रवास करावा लागतो. विमान प्रवास कितीही आरामदायी असला तरी तितकाच खर्चिकही असतो. पण, तुम्ही कमी खर्चात विमानप्रवास करू शकता. त्यासाठी काही टिप्स आम्ही तुम्हाला या व्हिडीओतून देतोय. व्हिडीओ शेवटपर्यंत पाहात राहा..
स्वस्त विमान तिकीट मिळवण्यासाठी पहिला आणि अगदी बेसिक नियम म्हणजे लवकर बुकिंग करणं. प्रवासाच्या दिवसाच्या किमान २१ दिवस आधी तिकिटाचं बुकिंग केलं तर तुम्हाला तुलनेने स्वस्तात तिकीट मिळतं. तिकीट बुक करण्यासाठी शक्यतो मंगळवार किंवा बुधवार निवडा. कारण बहुतांश एअरलाईन्स मंगळवारी संध्याकाळी सातच्या सुमाराला आपली बुकिंग प्रणाली सेट करतात.
प्रवास करण्याचा दिवसही आठवड्याचा मधला दिवस निवडा. कारण, त्यादिवशी गर्दी कमी असल्याने तिकीटंही स्वस्त असतात. तुमच्या फ्लाईटची वेळही तपासा. खूप रात्री किंवा पहाटेच्या फ्लाईट्स या तुलनेने स्वस्त असतात. फ्लाईटची स्वस्त डील मिळवण्यासाठी अशा ऑफर्स देणारे अॅप्स डाऊनलोड करा. जेणेकरून अनेक विमान कंपन्यांपैकी तुम्हाला बेस्ट डील देणारी कंपनी निवडता येईल.