Sunday, April 27, 2025
Homeताज्या घडामोडीSeema Haider: "मला पाकिस्तानला जायचे नाही. मला इथेच राहू द्या", सीमा हैदरचे...

Seema Haider: “मला पाकिस्तानला जायचे नाही. मला इथेच राहू द्या”, सीमा हैदरचे मोदींना साकडं

उत्तर प्रदेश: पहलगाम दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सुरक्षा मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत बुधवारी पाकिस्तानी नागरिकांसाठी व्हिसा सेवा निलंबित करण्यासह अनेक कठोर पावले उचलण्यात आली. ज्यामध्ये भारतात असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना त्यांचा व्हिसा संपण्यापूर्वी देश सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे मूळची पाकिस्तानी असलेल्या सीमा हैदर (Seema Haider) ला सुद्धा आता गाशा गुंडाळावा लागण्याची भीती वाटत असल्यामुळे, “मला पाकिस्तानला जायचे नाही. मला इथेच राहू द्या” अशी साकडं तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून मोदी सरकारकडे घातली आहे.

२०२३ मध्ये सीमा हैदरने तिच्या भारतीय प्रियकर सचिन मीनाशी लग्न करण्यासाठी पाकिस्तान सोडले तेव्हा ती चर्चेत आली होती. तिचे लग्न पाकिस्तानच्या सिंध प्रांतात आधीच झाले होते. तरीही ती तिच्या मुलांसह नेपाळमार्गे बेकायदेशीरपणे भारतात आली होती. सध्या सीमा हैदर उत्तर प्रदेशातील रघुपूर गावात राहत असून, अलीकडेच तिने एका मुलीला जन्म दिला आहे. आता ती चार मुलांची आई बनली आहे.

सोशल मीडियावर व्हिडीओ केला पोस्ट

सीमाचा भूतकाळ पाहता ती मूळची पाकिस्तानी असल्याकारणामुळे तिला देखील इतर पाकिस्तानी नागरिकांप्रमाणे भारत सोडावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे, “मला पाकिस्तानला जायचे नाही. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विनंती करते की मला भारतात राहू द्या.” असे सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत सीमाने सरकारकडे विनंती केली आहे.

सीमा आता पाकिस्तानी नाही- वकिलाने केला दावा

सीमाचा दावा आहे की सचिन मीनाशी लग्न केल्यानंतर तिने हिंदू धर्म स्वीकारला. देशभरातून झालेल्या विरोधानंतरही, तिच्या वकिलाला आशा आहे की तिला भारतात राहण्याची परवानगी मिळेल. ती आता पाकिस्तानी नागरिक राहिली नसल्याचा दावा सीमाच्या वकिलाने केला आहे.

दरम्यान, सीमा हैदरचे वकील एपी सिंह यांनी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, सीमाचा खटला इतर पाकिस्तानी नागरिकांपेक्षा वेगळा आहे. सीमाची सर्व कागदपत्रे गृह मंत्रालय आणि एटीएसकडे जमा आहेत. तसेच त्यांची याचिक राष्ट्रपतींकडे प्रलंबित आहे. सीमाच्या वकिलाने असाही दावा केला की सीमा आणि तिच्या कुटुंबाला पाकिस्तान समर्थित घटकांकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत होत्या, ज्यांच्याबाबत वेळोवेळी तक्रारी दाखल केल्या जात होत्या.

पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा २७ एप्रिलपासून होणार रद्द

सरकारच्या निर्णयानंतर परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केले की पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व वैध व्हिसा २७ एप्रिलपासून रद्द केले जातील. तर वैद्यकीय व्हिसा फक्त २९ एप्रिलपर्यंत वैध राहतील. त्यामुळे सीमा हैदरच्या बाबतीत सरकार कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -