
सोलापूर : सोलापूरकरांची (Solapur News) आतुरता असलेल्या विमानसेवेसंदर्भातील महत्वाची माहिती आता समोर आली आहे. मागील काहीं वर्षांपासून होटगी रोडवरील विमानतळ सुरू करण्यासंदर्भातील हालचाली सुरू झाल्या होत्या. याबाबत केंद्रीय उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही सोलापूरची विमानसेवा लवकर सुरू होईल, असे कळविले होते. त्यानंतर आता अखेर सोलापूर ते गोवा ही विमानसेवा सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. (Solapur to Goa Flight Service)

पर्यटकांना खोऱ्यात प्रवेश करण्यास बंदी नवी दिल्ली : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) जम्मू आणि काश्मीरमधील ट्रेकिंग (Jammu Kashmir Trekking) मोहिमांना ...
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी २६ मेपासून सोलापूर ते गोवा ही विमानसेवा सुरू होणार असल्याचे सांगितले आहे. फ्लाय ९१ या प्रवासी विमान वाहतूक करणाऱ्या कंपनीकडून सोलापूर विमानतळ येथून २६ मे रोजी पासून सोलापूर ते गोवा प्रवासी विमान सेवा सुरू करण्यात येणार आहे. ही विमानसेवा प्रवाशांना उपलब्ध करुन देण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. मात्र आता सर्व तांत्रिक अडचणी सोडवल्यानंतर अखेर सोलापूर ते गोवा दरम्यान नियमित प्रवासी विमानसेवा सुरू होणार आहे. त्यामुळे सोलापूरकरांना गोव्यापर्यंतच्या प्रवासासाठी नव्या पर्यायाचा लाभ घेता येणार आहे.
विमानसेवेआड येणारी चिमणी जमीनदोस्त
सोलापूर येथील होटगी रोडवरील विमानतळावरून विमानसेवा सुरू करण्यासाठी विमानतळाजवळील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची वीज निर्मिती चिमणी मोठी अडचण बनली होती. ती चिमणी विमान उड्डाण मार्गात अडथळा निर्माण करत असल्याने डीजीसीए (DGCA) कडून उड्डाणास परवानगी मिळत नव्हती. मात्र नऊ वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर अखेर दीड वर्षांपूर्वी ती चिमणी जमीनदोस्त करण्यात आली.
विमानतळावर इंधन सुविधाही उपलब्ध
मात्र, त्यानंतर पुन्हा ४२ सीट्स असलेल्या छोट्या विमानांऐवजी ७२ सीट्स असलेली विमानसेवा सुरू करण्याची मागणी करण्यात आली. त्या मागणीला मंजुरी मिळाल्यानंतर आणखी एक अडचण समोर आली, ती म्हणजे विमानतळावर इंधन पुरवठ्याची सुविधा नव्हती. मात्र प्रशासनाच्या पाठपुराव्यानंतर इंधनाच्या सुविधाही उपलब्ध करण्यात आल्या आहेत. (Solapur to Goa Flight Service)