
?si=4j_HpswUBcQM3G4B
मलेरिया खरंतर जवळपास दोन ते अडीच हजार वर्षांपूर्वीपासून माणसाला होतोय.. इसवी सन पूर्व पाचव्या शतकात होऊन गेलेला ग्रीक वैद्य हिपोक्रेटस यानेही मलेरियासारख्या आजाराची नोंद केलेली आढळते. पण, हा आजार डासांपासून होतो, हे शोधण्याचं श्रेय मात्र, डॉक्टर सर रोनाल्ड रॉस या ब्रिटीश माणसाला जातं.
सन १८९८मध्ये त्यांनी हा शोध लावला. या संशोधनाबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक सुद्धा मिळालं. अॅनोफिलिस या प्रजातीच्या डासाची मादी चावल्यामुळे मलेरिया होतो. हा डास प्लाझमोडियम सारख्या परजीवी जंतूचा प्रसार करतो. या जंतुची अंडी आधी डासाच्या पोटात तयार होतात, मग ती डास चावल्यानंतर त्याच्या लाळेतून माणसाच्या शरीरात जातात, हे रॉस यांनी शोधून काढलं.

Summer Tree : उन्हाळ्यात घरातील बाग किंवा कुंड्यांना असं ठेवा ताजंतवानं!
उन्हाळ्यात थंडावा देण्यासाठी आपल्या घरातली बाग किंवा कुंड्यांमधली झाडं मदत करतात. पण या उन्हाच्या झळा त्यांनाही बसतातच. त्यामुळे उन्हामुळे झाडं ...
थंडी वाजून ताप येणे, डोकेदुखी, अंगदुखी, थकवा ही लक्षणं दिसतात. वेळीच उपचार केले नाहीत तर रुग्ण कोमात जाऊन दगावण्याची शक्यता असते. त्यामुळेचं डासांची उत्पत्ती होणारी ठिकाणं नष्ट करणं, तिथे वेळोवेळी औषध फवारणी करणं गरजेचं असतं.